WhatsApp ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापासून लास्ट सीनपर्यंत करा ‘या’ 7 सेटिंग्ज, सेफ राहिल तुमचे अकाऊंट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीच्या वादानंतर अनेक यूजर्सला ते वापरताना अडचणी येत आहेत. त्यांना वाटते की त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट सेफ नाही. नवीन प्रायव्हसी पॉलिसी रद्द करण्यात आली आहे, परंतु आम्ही आपल्याला काही अशा सेटिंग्ज सांगणार आहोत ज्यांच्याद्वारे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट पूर्णणे सुरक्षित राहील. त्या सात सेटिंग्ज कोणत्या ते जाणून घेवूयात…

ग्रुपमध्ये कोण अ‍ॅड करू शकतो
व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी सेटिंग्ज यूजर्सला हे निवडण्याचा ऑपशन देते की, त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोण अ‍ॅड करू शकतो. अ‍ॅपमध्ये तीन ऑपशन देण्यात आले आहेत, ते यासाठी परवानगी देतात किंवा सेव्ड कॉन्टॅक्ट लिस्ट आणि पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट लिस्टसाठी अलाऊ करतात.

कोण पाहू शकतात स्टेटस
व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स सिलेक्ट करू शकतात की कोणते कॉन्टॅक्ट त्यांचे स्टेटस पाहू शकतात. स्टेटस प्रायव्हसी फिचरला अ‍ॅपच्या सेटिंग सेक्शनशी अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते आणि येथे यूजर्स आपल्या स्टेटसला एखाद्या विशेष कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसण्यासाठी निवडू शकतात किंवा केवळ सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्ट्सपर्यंत मर्यादित ठेवू शकता.

लास्ट सीन
लास्ट सीन प्रायव्हसी सेटिंग यूजर्सला दुसर्‍यांपासून आपण ऑनलाइन येण्याचा लास्ट सीन हाईड करण्याची परवानगी देते. सेटिंग्स अंतर्गत, यूजर्स आपला लास्ट सीन पूर्णपणे लपवू शकतात किंवा तो माय कॉन्टॅक्टवर सेट करू शकतात.

प्रोफाईल फोटो
दूसर्‍या ऑपशनप्रमाणे व्हाट्सएप यूजर्सला यास सुद्धा पूर्णपणे लपवणे किंवा माय कॉन्टॅक्टपर्यंत मर्यादित ठेवण्याचा ऑपशन मिळतो.

अबाऊट
अबाऊट सेक्शन अंतर्गत तीन ऑपशन आहेत. यूजर्स एकतर सर्वांना दिसण्यासाठी निवडू शकतो, तसेच पूर्णपणे लपवू शकतो किंवा यास केवळ माय कॉन्टॅक्टपर्यंत मर्यादित ठेवू शकतो.

फिंगर स्क्रीन लॉक
अँड्रॉईडवर व्हॉट्सअप वापरकर्ता फिंगरप्रिंट लॉक सेट करू शकतो, तर नवीन आयफोन यूजर्सकडे आयफोनमध्ये फिजिकल स्क्रीन बटनच्या बाबतीत फेस आयडी किंवा टच आयडी वापरण्याचा ऑपशन मिळतो.