जाणून घ्या : त्रिफळा आणि त्याच्यापासून होणारे हे 8 आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – त्रिफळा या शब्दाचा अर्थ आहे ‘तीन फळ’. परंतु आयुर्वेदात त्रिफळा अशा तीन फळांचे मिश्रण आहे जे तीनही अमृतीय गुणांनी परिपूर्ण आहेत. आवळा, बेहडा आणि हिरडा. आयुर्वेदात त्यांना आमलकी, बिभितकी, आणि हरीतकी असे म्हणतात. त्रिफळामध्ये या तिघांच्या बिया समप्रमाणात घेऊन पावडर बनवतात.

एका संशोधनात असे दिसून आले आहे की, त्रिफळाचे सेवन किरणोत्सर्गापासून बचाव करते. प्रयोगांमध्ये आढळून आले आहे की त्रिफळाच्या खुराकांमधून गामा किरणांच्या रेडिएशनच्या प्रभावामुळे होणाऱ्या अस्वस्थतेचे लक्षणं देखील आढळत नाहीत. म्हणूनच त्रिफळा चूर्णाला आयुर्वेदाची मौल्यवान भेट म्हणतात.

१) डोळ्यांसाठी : रात्री एक वाटी पाण्यात एक चमचा त्रिफळा पावडर भिजवून ठेवा. सकाळी कपड्याने ते पाणी गाळून घ्या आणि त्या पाण्याने डोळे धुवा. हा प्रयोग डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे डोळे स्वच्छ राहतात आणि दृष्टी सूक्ष्म होत असते. तसेच डोळ्यांची जळजळ, लालसरपणा अशा काही समस्या दूर होतात.

२) तोंडाचा गंध : रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ब्रश केल्यानंतर हे पाणी तोंडात धरून ठेवा आणि थोड्या वेळाने गुळणी करा. यामुळे दात आणि हिरड्या वृध्दावस्थेपर्यंत मजबूत राहतात. यामुळे अरुची, तोंडाचा दुर्गंध आणि तोंडातील फोड नष्ट होतात.

३) त्रिफळाच्या कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

४) त्रिफळाच्या काढ्याने जखम धुतल्याने अ‍ॅलोपॅथिक-अँटिसेप्टिकची आवश्यकता राहत नाही. जखम लवकर बरी होते.

५) गायीचे तूप आणि मध यांच्या मिश्रणा (अधिक तूप आणि कमी मध) बरोबर त्रिफळा पावडरचे सेवन डोळ्यांसाठी एक वरदान आहे.

६) मध्यम आहारासह याचे नियमितपणे सेवन केल्याने मोतीबिंदू, काचबिंदू-दृष्टीदोष इत्यादी डोळ्याचे आजार होत नाहीत.

७) मूत्रमार्गाच्या सर्व विकारांमध्ये आणि मधुमेहात हे अतिशय फायदेशीर ठरते. रात्री कोमट पाण्यात त्रिफळा घेतल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

८) प्रमाण : दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्री कोमट पाण्यात २ ते ४ ग्रॅम पावडर घ्यावी.

खबरदारी : त्रिफळा हे दुर्बल, कमजोर आणि गर्भवती महिलेने आणि ताप असल्यास खाऊ नये. जर तुम्हाला दुधाचे सेवन करायचे असेल तर दुधाचे सेवन आणि त्रिफळा या दरम्यान २ तासांचे अंतर ठेवा.