डॉलरच्या तुलनेत रूपया घसरल्यास तुमच्या दैनंदिन जीवनावर होतील ‘हे’ 7 मोठे परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ पहायला मिळत आहे. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किंमतीत घसरण झाली आहे. याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होऊ शकतो.
डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरणं झाल्याने त्या वाहनांच्या किंमती वाढतील ज्यांचे पार्ट परदेशातून आयात केले जातात. त्याचा थेट परिणाम वाहनांच्या किंमतींवर होईल.

1. परदेशातून आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक पार्टचा विचार केल्यास काॅंप्युटर, मोबाइल आणि टेलिव्हिजनच्या किंमती वाढू शकतात.
2. रुपयांच्या किंमत कमी झाल्यास पेट्रोलच्या, डिझेलच्या किंमती वाढतील. यामुळे महागाई वाढेल. त्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते.
3. सतत रुपयात घसरण झाली तर RBI च्या व्याज दरात वाढ होईल, यामुळे गृहकर्जाचे EMI वाढू शकतात.
4. रुपयांच्या घसरणीचा थेट परिणाम परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर होईल, त्या विद्यार्थ्यांना जास्त शुल्क द्यावे लागेल.
5. जे लोक नेहमीच परदेश प्रवास करतात, रुपयाच्या घसरणीमुळे त्यांच्यावर परिणाम होईल. त्याचा थेट परिणाम त्यांच्या खर्चावर होईल.
6. कच्च्या तेलाचे भाव आणि रुपयात घसरण झाल्याने पेट्रोल डिझलचे भाव वाढतील. त्याचा थेट परिणाम खिश्यावर होईल.
7. रुपयांच्या घसरणीचा फक्त नकारात्मक परिणाम होत नाही तर देशातील निर्यातदारांना याचा फायदा देखील होतो.

visit : policenama.com