महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ आजपासून सुरु !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार सर्वसामान्यांना आणखी एक दिलासा देणार असून लवकरच ‘वन नेशन-वन रेशनकार्ड हि योजना राबविणार आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना भारतातल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन विकत घेता येणार आहे. आजपासून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगना आणि गुजरातमध्ये या योजनेची ट्रायल सुरु करण्यात आली असून १ जुलै २०२० पर्यंत संपूर्ण भारतात हि योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

मिळालेल्या माहितीनुसार परराज्यात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी राज्यांच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांबरोबर बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले कि, पुढील वर्षी १ जुलैपर्यंत संपूर्ण देशात हि योजना लागू केली जाणार आहे. यासाठी देशातील २२ राज्यांमध्ये पीओएस मशीन लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

वन नेशन-वन रेशनकार्ड योजनेचे फायदे

१) केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी या योजनेविषयी बोलताना सांगितले कि, या योजनेचा सर्वात जास्त फायदा हा सामान्य नागरिकांना होणार आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना भारतातल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन विकत घेता येणार आहे. त्याचबरोबर यामुळे भ्रष्टाचाराला देखील आळा बसणार आहे.

२) रामविलास पासवान यांनी यांनी नागरिकांना या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. परराज्यात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे देशभरातील कोणत्याही दुकानातून तुम्ही रेशन घेऊ शकता.

३) या योजनेला पुढील वर्षभरात देशभरात देशात लागू करण्याची योजना आहे. यासाठी संपूर्ण रेशन दुकानांवर पीओएस मशीन लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच देशातील कोणताही नागरिक दुसऱ्या राज्यात देखील रेशन योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –