तुमच्या Aadhar Card चा वापर कधी आणि कोणत्या कामांसाठी झाला ? जाणून घ्या 7 पॉईंट्समध्ये

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी होणार्‍या आधार कार्डमध्ये (Aadhar Card)  यूजरची डेमोग्राफिक आणि बॉयोमेट्रिक माहिती नोंदलेली असते. विविध शासकीय आणि इतर कामांसाठी आपण आधार कार्डचा वापर करत असतो. अशावेळी त्याचा इतरांकडून गैरवापर होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही अडचणीत सुद्धा येऊ शकता. तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) कधी आणि कोणत्या कामांसाठी वापरले गेले आहे? हे जाणून घेणे खुप सोपे आहे, कारण युआयडीएआय घरबसल्या आधारकार्डधारकांना ही सवलत देत आहे.

अशाप्रकारे चेक करा आधार कार्ड कधी आणि कोणत्या कामांसाठी वापरले गेले

1. या लिंकवर https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar क्लिक करा.
2. तुमचा आधार नंबर टाका आणि त्याच्या खालील बॉक्समध्ये दिलेला सुरक्षा कोड टाकून स्वत:ला प्रमाणित करा.
3. जनरेट ओटीपीवर क्लिक करा.
4. ओटीपी जनरेट झाल्यानंतर तुमच्याकडे मोबाइलवर एक ओटीपी येईल.
5. यानंतर तुमचा ओटीपी भरा आणि ’सबमिट’ वर क्लिक करा.
6. यासोबतच तुम्हाला कालावधी आणि ट्रांजक्शनची माहिती सुद्धा भरावी लागेल.
7. यानंतर तुम्ही निवडलेली तारीख, वेळ आणि आधारशी संबंधीत सर्व माहिती मिळेल.