खरे आणि बनावट Aadhar Card मधील फरक कसा ओळखाल ? जाणून घ्या 10 पॉईंट्समध्ये

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी होणार्‍या आधार कार्डमध्ये (Aadhar Card ) यूजरची डेमोग्राफिक आणि बॉयोमेट्रिक माहिती नोंदलेली असते. अशावेळी जर आपल्या जर हे समजले की, तुमचे आधार कार्ड (Aadhar Card ) बनावट आहे, तर तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. यासाठी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की, तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे ते खरे आहे की बनावट? हे जाणून घेणे खुप सोपे आहे, कारण युआयडीएआय घरबसल्या आधारकार्डधारकांना याची सवलत देत आहे.

अशाप्रकारे चेक करा तुमचे आधार कार्ड खरे की बनावट

1. सर्वप्रथम पुढील यूआरएलवर क्लिक करा. https://resident.uidai.gov.in/aadhaarverification
2. या लिंकवर क्लिक करताच तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
3. जेव्हा हे आधार व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल तेव्हा तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल.
4. टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल.
5. यानंतर तुमचा 12 डिजिटचा आधार नंबर एंटर करा.
6. डिस्प्लेमध्ये दिसत असलेला कॅप्चा कोड (सिक्युरिटी कोड) एंटर करा. यानंतर व्हेरिफाय बटनवर क्लिक करा.
7. जर तुमचा आधार नंबर योग्य आहे तर एक नवीन पेज ओपन होईल.
8. ज्यामध्ये तुम्हाला एक मॅसेज मिळेल की, तुमचा आधार नंबर हा आहे, जसे की, 9908XXXXXXXX आहे.
9. यानंतर याच्या खाली तुमचे वय, जेंडर आणि राज्याचे नाव सुद्धा दिसेल.
10. अशाप्रकारे तुम्ही जाणून घेवू शकता की, तुमचे आधार कार्ड खरे आहे की, बनावट.