शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवीन ‘झिरो बजेट शेती’ योजना ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार एक नवीन योजना लाँच करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचे नाव झिरो बजेट शेती असे असेल. सध्याच्या काळात झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. खास करून दक्षिण भारतामध्ये सहकारी संस्था या शेतीचे यशस्वी प्रयोग करत आहेत. झिरो बजेट शेतीनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे, खते, पाणी इत्यादी उपाययोजना केल्या जातात. या शेतीसाठी साधने, पैसा कमी लागतो पण शेतीच्या पिकाला अधिक भाव मिळतो. यामुळेच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात झिरो बजेट शेतीचा प्रस्ताव ठेवला. कर्जावरील शेतकऱ्यांचे कर्जावरील अवलंबित्व कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे.

काय आहे झिरो बजेट शेती ; जाणून घ्या सविस्तर
झिरो बजेट शेतीमध्ये खर्च फार कमी येतो यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात सापडणार नाहीत. झिरो बजेट शेतीमध्ये एकाच वेळी दोन पिकांची लागवड करणे आणि शेताच्या बांधावर उपयुक्त झाडे लावणे यासारख्या योजनांमधून उत्पन्न मिळवले जाते.

म्हणजेच झिरो बजेट शेतीमध्ये उत्पन्न वाढविणे व खर्च कमी करण्यावर जोर दिला जातो. सामान्यतः शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. रासायनिक खते खूप महाग असतात. सरकारला देखील रासायनिक खतावर अनुदान द्यावे लागते. सेंद्रीय खतांचा वापर करून हा खर्च कमी करता येऊ शकतो.

गावातील शेण, गोमूत्र, गूळ, माती आणि पाण्याच्या मदतीने देशी खताची निर्मिती करता येऊ शकते. याच पद्धतीने कडुनिंब, शेण आणि धोतऱ्याचे फुल यांच्या मदतीने कीटकनाशक तयार करता येते. शेतीमध्ये बैलाचा वापर वाढवून डिझेलचा वापर कमी करता येऊ शकतो.

 

 

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर