‘तारूण्य’ टिकवायचंय तर मग ‘या’ फळाचा करा योग्य पध्दतीनं वापर, सुरकूत्यांची समस्या जाईल खूपच दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – थंडीत त्वचा फाटते किंवा कोरडी पडते. तसेच प्रदूषण, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा याचे शरीरावर नकारात्मक असे परिणाम दिसून येतात. तसेच चेहऱ्याला पुटकुळ्या येणं, मुरुम येणं, त्वचा निस्तेज होणं यांसारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. तुम्हाला देखील त्वचेच्या या समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या ड्रॅगन फ्रुट या फळाचे त्वचेला होणारे फायदे सांगणार आहोत.

१. सौंदर्य वाढण्यासाठी ड्रॅगन फ्रुटचा वापर केला जातो. या फळाच्या तुम्ही फेस मास्क तसेच केसांना लावायचा मास्क बनवू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे फोड, रुक्ष केस, केस गळणे उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी रोगांवर हे फळ चांगला उपाय ठरु शकते. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्याचबरोबर कॅल्शीयम, पोटॅशिअम, लोह आढळून येतो.

२. फ्री रेडिकल्स मुळे चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतात. तसेच वयवाढीचं लक्षण सुद्धा दिसायला लागत. त्यासाठी ज्या घटकांमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सीडंटस असतात. अशा फळांचा आहारात समावेश करावा. ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टी ऑक्सीडंटस आढळून येतात. म्हणून चेहऱ्यावरील सुरकुत्या नियंत्रणात राहण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचे सेवन करा. त्याव्यतिरिक्त त्याचा फेसपॅक देखील तुम्ही आपल्या चेहऱ्यावर लावू शकता.

३. त्याकरता ड्रॅगन फ्रुटमध्ये मध घालून फेसपॅक बनवा. तो फेसपॅक दररोज चेहऱ्याला लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होईल. तसेच त्वचा पहिल्यापेक्षा चमकदार दिसू लागेल. वेळेपूर्वीच चेहरा जास्त वयस्कर दिसायला लागला तर हा फेसपॅक वापरल्यास फरक दिसून येईल.

४. फेसपॅक तयार करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट कापून त्यातील प्लप काढून पेस्ट तयार करा. नंतर त्यात दही घाला आणि हे मिश्रण एकत्र करुन घ्या. हा फेसपॅक तयार झाल्यावर मान आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. सतत २ आठवडे हा प्रयोग केल्यावर त्वचेत फरक दिसून येईल.

(टिप- सर्वांसाठी हे उपाय फायदेशीर ठरतील असं नाही. उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)