राईच्या तेलानं होतात ‘या’ समस्या दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – राईच्या तेलानं होतात ‘या’ समस्या दूर, जाणून घ्या राईच्या तेलात एमयूएफए, पीयूएफ, ओमेगा ३ आणि ६, व्हिटॅमिन ई, खनिज आणि अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्याचसोबत यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लामेट्रीसारखे गुण असतात जे रोगप्रतिरोधक क्षमता वाढवण्यासोबत हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच त्वचेसाठी ते तितकंच फायदेशीर ठरतं असून, या तेलामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. राईच्या तेलाला येणार वास हा जास्त तीव्र असल्यामुळे अनेक लोकांना सहन होत नाही. त्वचेवर राईच्या तेलाने मसाज केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तर आज आम्ही तुम्हाला राईच्या तेलाचे त्वचेसाठी होणारे फायदे सांगणार आहोत.

१. एलर्जीपासून वाचवते

राईच्या तेलात अ‍ॅन्टी ऑक्सीड्स असतात त्यामुळे राईच्या तेलाने रोज अंगाची मसाज केल्यास फंगल इन्फेक्शन, त्वचेची आग होणे. तसेच खाज येण्याची समस्या निर्माण होणार नाही.

२. पचनाचे आजार दूर होतात

नियमित फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारुन पोटाचे विकार दूर होतात. सर्वांना अ‍ॅसिडीटीचा त्रास असतो. म्हणून आहारात मोहरी वापरल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण पोट व्यवस्थित साफ न झाल्यास त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

३. त्वचेचा रंग उजळतो

त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा उजळते. राईचे तेल शरीराला लावल्यास स्किनवर मॉइश्चरायजरचे काम करते. त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत नाही.

हिवाळ्याच्या दिवसांत टाचांना भेगा पडायची समस्या निर्माण होत असते. तुमच्या सुद्धा टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही राईचे तेल भेगांना लावल्यास आराम मिळतो. त्याचबरोबर सांधेदुखी अथवा ओठ फुटल्याची समस्या जाणवत असेल, तर राईच्या तेलाने तुम्हाला यापासून सुटका मिळू शकते.