लडाखच्या तरुण खासदाराचे विरोधकांचा पाणउतारा करणारे ‘दमदार’ भाषण ; तुफान व्हायरल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर साठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर अनेक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले. शहा यांचे राज्यसभा आणि लोकसभेतील भाषणाच्या अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकसभेत कलम ३७० संदर्भात चर्चा करताना अनेक खासदारांनी भाषण केले. पण असे एक भाषण ज्यांने विरोधकांची बोलतीच बंद झाली.

काश्मीरमधील ३७० रदद् करतानाच अमित शहा यांनी लडाख केंद्र शासित प्रदेश करत असल्याचे जाहीर केले. यावर विरोधकांनी भरपूर टीका केली. त्याला अमित शहांनी सडेतोड उत्तर दिले. पण ३७० रद्द करण्यावर आणि केंद्र शासित प्रदेश करण्यावर आक्षेप घेणाऱ्यांना लडाखचे तरुण खासदार जामयांग सेरिंग नामग्याल असे काही उत्तर दिले की विरोधकांना गप्प बसावे लागले. लोकसभेतील १७ मिनिटाच्या या भाषणामुळे सेरिंग नामग्याल देशभरात लोकप्रिय झाले आहेत.

नामग्याल यांचे लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ३७० रद्द करण्यासंदर्भात नामग्याल यांनी जे उत्तर दिले तसे उत्तर खुद्द अमित शहा यांना देखील देता आले नाही. ३३ वर्षीय नामग्याल हे लोकसभेतील सर्वात तरुण खासदार आहेत. भौगोलिक दृष्ट्या सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या लडाखचे ते प्रतिनिधत्व करतात. अवघ्या ३३ वर्षीय त्यांनी जे भाषण केले त्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. खुद्द लोकसभेत राजनाथ सिंह, अमित शहा यांच्यासह सर्व नेत्यांनी नामग्याल यांचे भाषणाला दाद दिली.

आरोग्यविषयक वृत्त