फायद्याची गोष्ट ! ‘जिओ गिगाफायबर’साठी रजिस्ट्रेशन सुरू, ऑनलाईन बुकिंग देखील उपल्बध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या ४२ व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, जिओचे ३४ कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झाली आहे. याचबरोबर त्यांनी कंपनीच्या अनेक नवीन सेवांची घोषणा केली असून यामध्ये त्यांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सची देखील घोषणा केली. Jio Fiber या इंटरनेट ब्रॉडबँड सेवेची देखील घोषणा केली असून पुढील महिन्यात म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. जिओ गिगाफायबरसाठी रजिस्ट्रेशन सुरू असून ऑनलाईन बुकिंग देखील उपल्बध आहे.

तीन स्टेप्समध्ये करा रजिस्ट्रेशन

रिलायन्स जिओने आपल्या Jio Fiber या इंटरनेट ब्रॉडबँड सेवेची देखील घोषणा केली असून यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. यासाठी तुम्ही जिओ डॉट कॉम वर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी लॉगइन करावे लागणार आहे. त्यानंतर वरच्या बाजूला जिओ गीगाफाइबर रजिस्ट्रेशन असा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला याठिकाणी तुमच्या घराचा पत्ता टाकावा लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोबाइल नंबर, ईमेल आयडी यांसारखी माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यानंतर तुम्ही तो टाकल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हि प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश येईल.

घरी येऊन इंस्टाल करणार ब्रॉडबँड सिस्टीम

याठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या ठिकाणाहून सर्वात जास्त ऍप्लिकेशन आले असतील त्याठिकाणी सर्वात आधी या सेवेला सुरुवात केली जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. यानंतर दोन तासात तुमची सेवा सुरु होणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

१०० एमबीपीएस मिळणार स्पीड

रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, या इंटरनेटचा स्पीड हा १०० एमबीपीएस पासून १ जीबीपीएस पर्यंत मिळणार आहे. या सेवेसाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसून ग्राहकांना केवळ राउटर साठी २५०० रुपये जमा करावे लागणार आहेत. ते देखील त्यांना रिफंड मिळणार आहेत. यासाठी ७०० रुपयांपासून ते १० हजाररुपयांपर्यंत मासिक खर्च येणार आहे. Jio Fiber या सेवेसाठी आतापर्यंत दीड कोटी नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले असून यासाठी कंपनी जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याचबरोबर जिओ फायबरचे वार्षित पॅक घेतल्यास HD TV ची सेवा मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like