मिरची खाल्ल्यानं कमी होतो हार्ट अटॅकचा धोका ! जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे

पोलिसनामा ऑनलाइन – वैज्ञानिकांच्या मते मिरचीचं सेवन केल्यानं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. आठवड्यातून चार पेक्षा जास्त वेळा जे लोक मसाल्याचे पदार्थ खातात त्यांच्यात हार्ट अटॅकनं मृत्यू झालेल्यांची संख्या 40 टक्के कमी होती. तर मिरची न खाणाऱ्यांमध्ये आजाराचं प्रमाण जास्त होतं. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी या पुस्तकात यासंदर्भातील माहिती नमूद करण्यात आली आहे.

इटलीच्या पॉरजिल्ली मध्ये न्यूरोमेड न्यूरोलॉजिकल इंस्टीट्युटमधील तज्ज्ञांनी गेल्या 8 वर्षांपासून हेल्दी आणि अनहेल्दी आहार घेणाऱ्या लोाकांचं निरीक्षण केलं. यात असं दिसून आलं की, मिरची न खाणाऱ्यांच्या तुलनेत मिरची खाणारे लोक जास्त सुदृढ होते. हिरवी मिरची पचन तंत्रासाठी खूप लाभदायक असते. यामुळं त्वचाही साफ राहते आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते.

हिरव्या मिरचीचा शरीराला खूप लाभ मिळतो. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, लोह, पोटॅशियम आणि कर्बोदकाचा समावेश असतो. यामुळं शरीराला याचा खूप फायदा होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचं आहे. यामुळं वाढलेली शुगर लेवल कमी करण्यासाठी मदत होते. मिरचीच्या सेवनानं शरीरातील फॅट कमी होतात आणि मेटाबॉलिजम वाढतं. याशिवाय अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठीही मिरचीचा खूप लाभ होतो.