लठ्ठपणा, त्वचा, आणि केसांसाठी गुणकारी ‘कढीपत्ता’, ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – पदार्थांची चव वाढवण्याचे काम करणारा कढीपत्ता आरोग्यासाठी किती गुणकारी आहे, हे अनेकांना माहित नाही. अन्न पदार्थांची चव वाढवणारी वनस्पती याच दृष्टीने त्याकडे पाहिले जाते, परंतु कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. विविध आजारांवर तो लाभदायक ठरतो. योग्य पद्धतीने कढीपत्त्याचे सेवन केल्यास अनेक आजार दूर राहतील. कढीपत्तीच्या सेवन केल्याने कोणकोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1 दाट काळे केस
कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट तयार करा. त्यामध्ये थोडे दही घालून केसांना लावा. केस 20-25 मिनीटे तसेच ठेवून नंतर शॅम्पूने केस धुवा. नियमित हा उपाय करा.

2 पिंपल्स
कढीपत्त्याचा चहा करुन प्या. कढीपत्त्यामुळे रक्तशुद्धीकरण होते. ग्रीन टी प्रमाणे कढीपत्ता टी बनवून प्या.

3 इम्युनिटी
आहारात कढीपत्त्याचाही समावेश करा. यामुळे आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होतील. आजारांशी लढण्याची ताकद कढीपत्ता देईल.

4 मधुमेह
कढीपत्त्याची पाने नियमितपणे खाल्ल्यास रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.

5 कोलेस्ट्रॉल
कढीपत्ता आहारात समाविष्ट करा. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

6 जुलाब/उलटी
जुलाब, उलटीचा त्रास होत असेल आणि एखाद्यावेळी त्यातून रक्त पडत असल्यास कढीपत्त्याची पाने पाण्यासोबत वाटून ते पाणी गाळून घ्या. 1-1 चमचा या प्रमाणात 2-3 तासांच्या अंतराने प्या.

7 त्वचारोग
कढीपत्ता रक्तशुद्धी करत असल्याने विविध प्रकारचे त्वचारोग दूर होतात. यासाठी कढीपत्त्याचा चहा नियमित घ्या.