उपाशी पोटी पेरू खाल्यानं होते ‘या’ गंभीर आजारापासून सुटका !

पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळ्यात उपलब्ध होणारे पेरू हे फळ खाण्याची सर्वांचीच इच्छा असते. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. पण अनेकजण या फळात असलेल्या बीयांमुळे मुतखडा होईल किंवा दातांच्या दुखण्याचा त्रास होईल, असा विचार करुन पेरू खाण्याचे टाळून देतात. तसेच अनेकांच्या घरी पेरूची झाड देखील असतात. पण कच्चा पेरू खाण्याचे फायदे असतात हे त्यांना माहिती नसतं. पेरू व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमुख स्रोत आहे. तसेच पेरूच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करावा. चला तर मग जाणून घेऊया पेरूच्या सेवनाचे फायदे.

१. मलाविरोधी त्रास जाणवत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करा. त्यामुळे आतड्यांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होण्यास मदत होते. तोंडाचा अल्सर बरा करण्यासाठी पेरू उपयुक्त ठरू शकतो.

२. सकाळी सकाळी उपाशीपोटी पेरू खाणे खूप फायदेशीर ठरते. तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पान चावल्यास फायदेशीर ठरते.

३. पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरड्यांची सूज व मुख विकार दूर होतात.

४. पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायची. यामुळे डोळ्यांच्या खाली असणारे काळे डाग व सूज कमी होण्यास मदत होते.

५. मधुमेह, मोतीबिंदू, खोकला, हृदयविकारच्या आणि वजन कमी होण्याच्या समस्येसाठी पेरूचे सेवन उपयुक्त ठरत असते. पेरू कॉलेस्ट्रॉल कमी करून उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवतो.

६. पेरूच्या बीया चावून-चावून खाल्ल्याने त्या शरिरातील लोहाच्या कमतरता भरुन काढतात. पेरूमध्ये असलेल्या लायकोपीन या घटकामुळे कॅन्सर आणि ट्युमरचा आजार होण्यापासून बचाव करता येऊ शकतो.