हार्ट अटॅकला ठेवा दूर, रोज फक्त अर्धा चमचा ’हे’ तेल वापरले तर होतील 11 आरोग्यदायी फायदे

हृदयरोगांचे प्रमाण सध्या खुपच वाढले आहे, केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात हीच स्थिती आहे. कोरोना काळात तर हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण खुपच वाढल्याचे दिसून येत आहे. जर हृदयाचे गंभीर आजार टाळायचे असतील तर आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. आहारात काही खास पदार्थांचा समावेश करून तुम्ही हार्ट अटॅकचा धोका कमी करू शकता. अमेरिकेतील रिसर्चनुसार अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहे. रिसर्चमधील निष्कर्षानुसार हे तेल अर्ध्या चमचा खाल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता 20 टक्के कमी होते. ऑलिव्ह आईलचे कोणकोणते फायदे आहेत आणि हा रिसर्च करणार्‍या संशोधकांनी काय म्हटले आहे ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1 हार्ट अटॅक येण्याची शक्यता 20 टक्के कमी होते.
2 हृदय रोगाची जोखीम 15 टक्क्यांनी कमी होते.
3 कोरोनरी हार्ट डिसीजचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.
4 अनहेल्दी, ट्रांन्स फॅटी अ‍ॅसिड्सना चांगल्या फॅट्समध्ये बदलते.
5 सुज कमी होते
6 कॉलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा घडून येते.
7 हृदयविकाराचा धोका कमी होतो.
8 बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
9 डायबेटीसही नियंत्रणात राहतो.
10 वजन कमी होण्यास मदत होते
11 मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहते.

हे लक्षात ठेवा
अनेक वर्षांपासून हृदयाशी संबंधीत औषधांमध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तुम्ही तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी करता येत नाही. याचा वापर सलाड किंवा मंद आचेवरील जेवणात केला जातो. एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रिकाम्या पोटी घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. पण या तेलाचं सेवन करण्याआधी तुम्ही चार तास काहीही खाऊ नका.