बटाट्याच्या सालीचे ‘हे’ 6 चमत्कारिक फायदे समजले तर कधीही फेकणार नाहीत !

विविध प्रकारच्या फळभाज्या, फळे खाण्यासाठी आपण त्यांची साल काढून टाकून देतो, आणि आतील हवा असलेला भाग तेवढाच घेतो. साल ही टाकावू असते, असे आपल्या मनात फिट झालेले असते. परंतु, अशी अनेक फळे आणि भाज्या आहेत ज्यांच्या सालींमध्ये चमत्कारिक अशी शक्ती दडलेली असते. अशी बहुमुल्य गोष्ट आपण टाकावू म्हणून फेकून देतो. अशाच प्रकारे बटाट्याची सालदेखील आपण टाकून देतो. बटाट्याच्या सालीत असंख्य आरोग्यदायी गुणधर्म आहेत, त्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1 त्वचेसाठी लाभदायक
बटाट्याच्या सालीचा रस चेहर्‍यावर चोळल्यास चेहरा उजळतो. डोळ्यांच्या खालची वर्तुळं निघून जातात. बटाटाची साल केसांवर चोळून काही मिनिटांनी केस धुवावेत. यामुळे केस लांबसडक होतात.

2 हृदयरोग
यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयाच्या आजारात साल रामबाण आहे. यातील ओमेगा-3 फॅट्स मुळे हृदय निरोगी राहते.

4 उष्णता
बटाट्याची साल पायांच्या तळव्यांना घासल्याने उष्णता कमी होते.

5 कोलेस्ट्रॉल
बटाट्याची सालीत भरपूर फायबरर्स असल्याने कॉलेस्ट्रोल कमी होते. बटाटा सालीसकट खाल्ल्यास आयर्नचे प्रमाण वाढते.

6 उर्जा
बटाट्याच्या सालीत व्हिटॅमिन बी-3 असल्याने हे कार्बोहायड्रेटचे रूपांतर ऊर्जेत करते. यामुळे नव्या पेशींचीही निर्मिती होते. स्ट्रेसमुळे पेशींना होणारी हानी टळते.