लॉकडाऊननंतर ट्रेनऐवजी या पध्दतीनं प्रवास करणं पसंत करताहेत लोक ! दररोज वाढतेय प्रवाशांची संख्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना संकटादरम्यान साफ-सफाई आणि संसर्गाच्या भितीमुळे लोक बस, ट्रेनमध्ये प्रवास करण्यास कचरत आहेत. यामुळे लोक मोठ्या संख्येने विमान प्रवासाला पसंती देत आहेत. परिणामी हळुहळु विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी सांगितले की, 4 ऑक्टोबर 2020 ला एका दिवसात विमान प्रवास करणार्‍या लोकांची संख्या 1,68,860 पर्यंत पोहचली होती.

वेगवेगळ्या एयरपोर्टवरून 4 ऑक्टोबरला 1,458 फ्लाइट्स

हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, आता स्थानिक विमान प्रवाशांची संख्या हळुहळु कोरोना व्हायरस प्रकोपाच्या अगोदरच्या स्थितीकडे जात आहे. 4 ऑक्टोबर 2020 ला देशातील विविध विमानतळांवर पोहचणार्‍या लोकांची संख्या 3,37,234 होती. देशातील विविध विमानतळांवरून 4 ऑक्टोबरला 1,458 फ्लाइट्स झाल्या. केंद्र सरकारने 25 मेपासून स्थानिक उड्डाणे सुरू करण्याची परवानगी दिली होती. यानंतर हळुहळु प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे.

अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोना टेस्टचे 5 हजार

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, 23 मार्चपासून अंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. यामध्ये अजूनपर्यंत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. मात्र, या दरम्यान स्पेशल फ्लाइट्सद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यात आले होते. परंतु, आता स्थिती सामान्य करण्यासाठी हळुहळु काही देशांसोबत करार केले जात आहेत. मात्र, अंतरराष्ट्रीय उड्डाणांसाइी नियम खुपच कडक करण्यात आले आहेत. तर, दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्टवर परदेश प्रवास करणार्‍यांसाठी आरटी-पीसीआर टेस्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सविधा टर्मिनल-3 च्या कार पार्किंग एरियात सुरू करण्यात आली आहे. कोरोना टेस्ट करणार्‍या प्रवाशांकडून येथे 5,000 रुपये वसूल केले जातील.