प्रायव्हेट पार्ट्सवर प्रचंड खाज येण्याची ही असू शकतात कारणं, ही काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक महिलांना प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याची समस्या उद्भवते. याची अनेक कारणं असू शकतात, जसं की, फंगल इंफेक्शन, यीस्ट इंफेक्शन, लाल चट्टे येणं, योनीतून पांढरं पाणी येणं. याकडे दुर्लक्ष केल्यास याचं रुपांतर मोठ्या त्वचारोगत होऊ शकतं. आज यावर काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

व्हजायनात खाज येण्याची कारणे कोणती ?

–  योनी मार्गातून पांढरं पाणी बाहेर येत असल्यानंही याचा त्रास होतो आणि खाज येते.

–  व्हॅक्सिंग केल्यानंतर किंवा रेजर फिरवल्यानंही खाज येण्याची समस्या येते.

–  मासिका पाळीआधीही अशी समस्या येण्याची शक्यता असते.

–  काही वेळा प्रायव्हेट पार्टमध्ये बॅक्टेरिया असतात. जर तु्म्ही अँटीबायोटीक्स घेतलं किंवा हार्मोन थेरपी घेत असाल तर शरीरातील अॅस्ट्रोजनची पातळी वाढते यामुळं वाईट बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. हे कारण आहे की, यीस्ट इंफेक्शन होतं आणि व्हजायनात खाज येते.

– सेक्स हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतरही प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याची समस्या उद्भवते. यावर कोणते उपाय करावेत ?

1)  पाणी –  जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. शरीर डीहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या.

2)  दही –  दह्याचं सेवन केल्यानं शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. यामुळं इंफेक्शन कमी होण्यास मदत होते. दही एक नैसर्गि प्रोबायोटीक आहे.

3)  कोरफडीचा गर –  जर तुम्ही इंफेक्शन झालेल्या ठिकाणी हा गर लावला तर खाजही सुटणार नाही आणि आगही होणार नाही.

4)  सॅनिटरी पॅड बदलणं –  मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखा. वेळोवेळी पॅड बदलायला विसरू नका.

5)  तेल –  दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल समप्रमाणात घेऊन हे तेल इंफेक्शन झालेल्या ठिकाणी लावावं. हे तेल सर्वच प्रकारच्या फंगल इंफेक्शनला चालेलच असं नाही. म्हणून जर तुम्हाला डॉक्टरांनी तेल न लावण्याचा सल्ला दिला असेल तर या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.