दाढदुखीच्या वेदनेनं परेशान आहात ? जाणून घ्या कारणं अन् उपाय

अनेकांना 17 -21 किंवा 21 नंतर अक्कल दाढ येते. अनेकांना ही दाढ आल्यानंतर भरपूर वेदना होतात. ही दाढ येताना एवढा त्रास का होता यामागील कारण आणि यासाठी काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

अक्कल दाढ कधी काढावी ?

1) अक्कल दाढ किडून खूप दुखत असेल तर ती काढून टाकावी.
2) अक्कल दाढेभोवती जी हिरडी असते ती वारंवार जेवण अडकल्यामुलं जर सुजत असेल तर काढणं योग्य ठरतं.
3) अक्कल दाढेमुळं बाहेरच्या भागावर सूज असेल तर ती काढून टाकावी.
4) जर अक्कल दाढ येताना वाकडी आली असेल आणि ती शेजारच्या दाताला त्रास देत असेल तर ती काढून टाकावी.
5) अक्कल दाढेचा संसर्ग होऊन शेजारचा दात जर किडत असेल तर ती काढून टाकावी.
अक्कल दाढ काढल्यानंतर काही वेळ रक्तस्राव होतो. दुसऱ्या दिवशी तोंडाला सूज येऊन किंचित त्रासही होऊ शकतो.

अक्कल दाढेमुळं निर्माण होणाऱ्या तोंडाच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो.

काय करावेत उपाय ?

1) दातदुखीवर मीठ खूप उपयुक्त ठरतं. हिरड्यांची जळजळ यामुळं कमी होते. मीठाचा वापर केला तर संसर्गाचा धोकाही कमी होतो.

2) कांदा आणि लसूण दाढीसाठी फायदेशीर ठरतात. लसणात अँटी ऑक्सिडेंट, अँटी बायोटीक आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. याशिवाय यात इतरही औषधी गुण असतात. यामुळं दाताच्या वेदनेत आराम मिळू शकतो. हिरड्यांच्या संसर्गापासूनही सुरक्षा मिळते.

3) दातदुखीमध्ये पेरूची पाने आणि लवंग औषधांसारखे काम करतात. यात वेदना कमी करणारी आणि अँटी मायक्रोबियल गुण असतात. यामुळं दातदुखी कमी होते.