अंगदुखीचं कारण ठरू शकतो हाडांचा कॅन्सर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कॅन्सर म्हणजे कर्करोग हा किती गंभीर आणि जीवघेणा आजार हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, जर वेळीच या आजाराची माहिती मिळाली तर त्यापासून बचाव केला जाऊ शकतो. या आजारातून बाहेर आलेली कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतात. अर्थातच यावरील उपचार जरा महागडे आहेत. पण कॅन्सरबाबत लोकांमध्ये फार जागरुकताही बघायला मिळत नाही. अनेकांना वाटत कॅन्सर एकच किंवा दोनच प्रकारचे असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला हाडांच्या कॅन्सर बाबत माहिती देणार आहोत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण नकळतपणे सांधेसुखीच त्रास या सारख्या मोठ्या आजाराचं कारण देखील असू शकते.

आपल्या शरीरातील कोणत्याही भागावर हाडाचा कॅन्सर उद्भवू शकतो. बोन कॅन्सर हा हाडांच्या नसांवर परिणाम करतो. त्यामुळे हाडांना सूज येते असते आणि कोणतीही क्रिया करत असताना हांडाचे कार्य सुरळीत होत नाही. हा कॅन्सर हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. हाडांच्या आणि फुफ्फुसांच्या आजूबाजूस कॅन्सर च्या पेशी पसरत असतात. हाडांमधून जेव्हा हा कॅन्सर फुफ्फुसात पसरतो. त्यावेळी त्याला लंग्स कॅन्सर न म्हणता हाडांचा कॅन्सर म्हटलं जाते. तर जाणून घेऊया हाडांच्या कॅन्सरची लक्षणे, कारणे आणि उपाय.

लक्षणे
१. हाडांमध्ये तीव्र वेदना होते.
२. प्रभाव असलेल्या भागात सूज येते.
३. हाड ठिसून होतात.
४. थकवा येतो.
५. वजन कमी होते.

कारणे
यामध्ये अनुवंशिकता हे सुद्धा हाडांचे कॅन्सर होण्याचं कारण असू शकते. यापूर्वी कुटूंबातील एका व्यक्तीला कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. वयाच्या ४० वर्षानंतर हाड कमकुवत आणि कमजोर होण्यास सुरुवात होते आणि त्याने हाडांचा कॅन्सर होतो. जर तुम्हाला कॅन्सर झाला असेल आणि तुम्ही किमोथेरपी किंवा स्टिल सेल ट्रान्स प्लांटेशन केलं असेल त्यामुळे रेडिएशनचा नकारात्मक परिणाम होऊन हाडांचा कॅन्सर होऊ शकतो. हा आजार झाल्यास एक्स रे, एमआरआय, बोन स्कॅन, पीईडी स्कॅन या चाचण्या करुन तुम्ही डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेऊ शकता.

उपाय
सध्या उपलब्ध असलेल्या किमोथेरपी व रेडिओथेरपीसारख्या अत्याधुनिक औषधांमुळे यावरती खात्रीशीर उपाय करता येतो. काही प्रकारच्या हाडांच्या कॅन्सर साठी हे उपाय यशस्वी ठरल्याने शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तरुण वयात आढळणार हा आजार सगळीकडे पसरण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, दुर्दैवाने लवकर निदान करण्याच्या खात्रीशीर तपासण्या आपल्याकडे अजूनही उपलब्ध नाही.