जीने चढताना दम लागतो ? ही 3 लक्षणे आहेत हृदयाशी संबंधीत, दुर्लक्ष पडेल महागात

पोलीसनामा ऑनलाइन – बदललेली जीवनशैली, बदललेले कामाचे स्वरूप, व्यायामाचा अभाव, आहाराकडे दुर्लक्ष आदी कारणांचा आपल्या शरीरावर खुप परिणाम होत आहे. अलिकडे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह हे आजार मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहेत. शिवाय, हे आजार तरूणांना होण्याचे प्रमाणदेखील चिंताजनक असेच आहे. सतत बैठे काम, सोयीसुविधा यामुळे शरीराची हालचाल होत नाही. शरीरावर याचे वाईट परिणाम झाल्याने काही गंभीर आजारांची लक्षणे दिसू लागतात. थोडे जरी शारीरीक कष्ट केले तरी दम लागणे हेदखील असेच गंभीर आजाराचे लक्षण आहे. हृदयाच्या आजाराची ही गंभीर लक्षणे कोणती आहेत ते आपण जाणून घेवूयात.

याकडे करू नका दुर्लक्ष

1 जीना चढताना दम लागणे.
2 पाय दुखणे.
3 जीने चढताना जास्त घाम येणे.

ताबडतोब डॉक्टरांकडे जा
* हाय कॉलेस्ट्रॉल, हाय बीपी, लठ्ठपणा, मधुमेह यांपैकी कोणतीही समस्या असल्यास दम लागण्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी डॉक्टरकडे वारंवार तपासणीची गरज आहे. यामुळे भविष्यात हृदयाविषयीचा धोका दूर करू शकता.

* जर रोज सहजतेने जीने चढत असाल आणि दम लागण्याचा त्रास होत असेल तर शारीरिक व्यायाम आणि हालचालीची गरज आहे. तसेच धोका टाळण्यासाठी वेळोवेळी मेडीकल चेकअप करा.

हार्ट अटॅकची लक्षणे

1 छातीत दुखणे.
2 पोटाच्या डाव्या बाजूला दुखणे.
3 खूप घाम सुद्धा येणे.
4 थंड घाम येणे.
5 श्वास घेण्यास त्रास.
6 वारंवार डोकं दुखणे