होय, तुम्हाला फक्त पनीर खाण्याचे फायदेच माहिती, आता घ्या ‘तोटे’ जाणून

पोलीसनामा ऑनलाइन – पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, झिंक सुद्धा चांगल्या प्रमाणात असल्याने पनीर खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. ज्या नागरिकांच्या शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमित व्यायाम करतात त्यांना पनीर खाण्याची आवश्यकता असते. पण ते कधी किती प्रमाणात खायला हवं, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पनीरच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. लिव्हर मजबूत राहतं. तसेच वाढत्या वयासोबत निर्माण होणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यास पनीर फायदेशीर ठरत. पनीरचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखीची समस्या कमी होते. एका दिवसात २०० ग्रॅमहुन अधिक पनीर सेवन करु नये. एका वेळेत १०० ग्रॅम पनीर पुरेसं असते. रात्री उशिरा पनीर खाऊ नये. नेहमी वेगवेगळ्या भाज्यांसोबत मिक्स करुन पनीर खावं. त्यामधील प्रोटीन आणि फायबरमुळे आपलं पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवत. आणि ते शरीरात खूप चांगल्या पद्धतीने पचवलं जात. हंगामी भाज्या आणि पनीर बरोबर प्रमाणात खाव्यात, कारण पनीरमध्ये सोडियमचे प्रमाण खूप असते जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशिअमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रुपांतर करत.

पनीर खाण्याचे फायदे तोटे

१. पनीर खाल्याने शरीरात ऊर्जा तयार होते. त्यामुळे पनीरचा हेल्दी फूडमध्ये समावेश होतो.
२. पनीरच्या सेवनाने आजारांपासून दूर राहता येत.
३. पनीरमध्ये असलेल्या प्रोटिन्स मुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच ती झटकन वाढून कमी सुद्धा होत नाही.
४. शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन कमी होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
५. पनीरमध्ये कॅल्शियम जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होतात. पण पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास जाणवत असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.
६. पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोका असतो.
७. तसेच कच्च पनीर खाणं हे गरोदर महिलांसाठी नुकसानदायक ठरु शकते.