प्रदुषणामुळं तारूण्यातच तुम्ही दिसू लागता म्हातारे, ‘या’ टिप्स फॉलो कराल तर फायद्यात रहाल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे तसेच महिलांच्या मोठ्या प्रमाणात कॉस्मेटिक्सच्या वापरामुळे चेहरा किंवा शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्वचेवर होणारा प्रदूषणाचा परिणाम महागात देखील पडू शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण प्रदूषणाचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊन तुम्ही वेळेपूर्वीच म्हातारे दिसू शकता. ही समस्या खूप लहान वाटते पण नंतर या समस्येचं रूपांतर मोठ्या त्वचेच्या आजारात बदलू शकत. तर आज आम्ही तुम्हाला प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याची माहिती देणार आहोत.

१. एक्झिमा
तुम्हाला प्रदूषणामुळे एक्झिमा हा त्वचेच्या संदर्भातील आजार होऊ शकतो. यामुळे त्वचेवर खाज, जळजळ होणे, रॅशेस येणे अशा समस्या निर्माण होतात. तुमच्या त्वचेवर लहान लहान आकाराचे पाण्याने भरलेले बारीक बारीक फोड येतात आणि त्यामुळे खाज येते. ती खाज अत्यंत तीव्र स्वरुपाची असून, त्वचा लालसर होते.

२. म्हातारपण
प्रदूषणाने तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. कमी वयात म्हातारपण आल्याचं सुद्धा दिसू शकत चेहरा खराब होण्यास सुरुवात होते. एंन्टीएजिंगच्या खुणा तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ शकतात. त्यामुळे चेहरा निस्तेज होतो आणि सुरकुत्या येण्याची समस्या सुद्धा जास्त उद्भवते.

३. त्वचेचा कोरडेपणा
सतत तुम्ही कामासाठी बाहेर पडत असताना प्रदूषणाचा सामना करावा लागत असेल तर चेहरा कोरडा पडण्याची शक्यता असते. तसेच त्वचेवर पुटकुळ्या येतात आणि चेहरा काळा पडतो. त्यानंतर पुन्हा आधीसारखी त्वचा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

४. केस खराब होतात.
कामासाठी बाहेर पडत असताना प्रवासासाठी बाईक अथवा स्कुटी चा वापर करत असाल तर चुकूनही केस मोकळे सोडू नका. जर तुम्ही केस मोकळे ठेवले तर खराब होतात. शिवाय धुळीचे कण केसांवर बसतात. त्यामुळे चेहरा आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. केस गळायला सुरुवात होते. आणि केसात कोंडा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

तसेच चेहरा दिवसातून दोन ते तीनवेळा धुवा. त्याशिवाय जर तुम्ही त्वचेवर मेकअप करत असाल किंवा पावडर लावत असाल तर आधी मेकअप रिमुव्हरचा वापर करुन कापसाच्या बोळ्याने चेहरा स्वच्छ करा. मग कोमट पाण्याने धुवा.