कमी खाण्याच्या सवयीमुळं वाढू शकतो तुमचा एकटेपणा ! जाणून घ्या रिसर्च काय सांगतो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  एका रिसर्चमधून असा खुलासा झाला आहे की जे लोक कमी खातात किंवा मोजकंच खातात ते एकटेपणाचा सामना करत असतात. खास बात अशी की, असे लोक त्यांना आवडत असणारे पदार्थ खातानाही खूप विचार करतात. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातील प्रोफेसर केटलिन वूली यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

वूली यांच्या मते, तुम्ही लहान असो वा मोठे प्रत्येक वयोगटातील लोकांना एकटेपणा येत असतो. खास करून जी लोक डाएट प्लॅन फॉलो करतात ते लोक पार्टीसाठी किंवा बाहेर जेवायला गेले तर ते फक्त शरीरानंच तिथं उपस्थित असतात. कारण त्यांच्या डोक्यात सतत इतकंच असतं की, ते किती कॅलरीज घेत आहोत. त्यामुळं ते इतर लोकांशी जास्त कनेक्ट होत नाहीत.

वूली यांच्या अभ्यासानुसार, जे डाएट प्लॅन फॉलो करतात किंवा कमी जेवण करतात अशा लोकांमध्ये एकटेपणाचं प्रमाण जास्त असतं. यात लहान मलं आणि अविवाहित महिलांचंही प्रमाण अधिक आहे. कारण अशा लोकांना अशी भीती सतावत असते की, आपण जर जास्त आहार घेतला तर आपण जाड तर होणार नाही ना. असे लोक शारीरिकरित्या चांगले तर राहतात परंतु मानसिक आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होतो.

वूली यांच्या मते, लहान मुलांमध्येही अशा भावना असतात. परंतु याचं प्रमाण कमी असतं. ते लहान असल्यानं याचा जास्त विचार करत नाहीत. याबाबत ते निश्चिंत असतात. 19 टक्के लोक असे असतात ज्यांना कमी खाण्यामुळं एकटेपणाची भावना येते.

हा रिसर्च रिपोर्ट जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी या पुस्तकात छापण्यात आला आहे.