तुमच्या पायांचा दुर्गंध येतो का ? जाणून घ्या ‘कारणं’ अन् योग्य ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण जेव्हा पायातून शुज काढतात तेव्हा लगेच त्यांच्या पायाचा दुर्गंध यायला सुरुवात होते. यावर अनेक उपाय केले तरी फरक पडत नाही. आज आपण या समस्येच्या कारणांसोबत याची सविस्तर माहिती आणि यावर काही उपाय जाणून घेणार आहोत.

काय आहे कारण ?

पायाचा दुर्गंध येण्याचं खास कारण आहे ते म्हणजे तिथला ओलावा. घाम आणि या ओलाव्यात फरक असतो. शरीरावर रोमछिद्रे किंवा केस असणाऱ्या जागी घाम येतो आणि तळहात आणि तळपायांवर हा ओलावा येत असतो. घाम येणं ही एक सामान्य बाब आहे.

धोक्याची घंटा

तज्ज्ञ सांगतात, तळपाय किंवा तळहातांवर खास प्रकारचा ओलावा येण्याची समस्या ही चिंता करणाऱ्या लोकांना अधिक होते. असं होणं म्हणजे तुम्ही एखाद्या मानसिक दबावात असता असंही एक्सपर्ट्स सांगतात.

मेंटल हेल्थ

जर दीर्घकाळापासून तुम्हाला तुम्हाला एखादं टेन्शन किंवा स्ट्रेस असेल तर याचा नकारात्मक प्रभाव शरीरावर पडतो. त्यामुळं असं काही असेल तर वेळीच तो ताण तणाव दूर करा. पाय किंवा तळहातावर येणारा ओलावा मेंटल हेल्थ बाबत संदेश देत असतो.

कुणाला होते समस्या ?

तळपाय किंवा तळहातांवर खास प्रकारचा ओलावा येण्याची समस्या ही चिंता करणाऱ्या लोकांना अधिक होते. जे जास्त विचार करतात त्यांनाही ही समस्या जाणवते. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही विचार सुरू असतो.

कशी होते क्रिया ?

सतत विचारात गुंतून राहणारे लोक चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकत नाहीत. त्यामुळं त्यांना इच्छेनुसार रिझल्ट दिसत नाही. अशानं ते अधिकच तणावात येतात. त्यामुळं त्यांच्या तळपायांना किंवा तळहातांना हा ओलावा येतो. यात पाय शुजमध्ये बंद असतात. याचंच दुर्गंधात रूपांतर होतं.

कशी दूर कराल ही समस्या ?

– सर्वात आधी टाईम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. आपली कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होतील असं नियोजन करा. कामं जर वेळेत पूर्ण झाली तर मेंदूवरील ताण कमी होईल. यामुळं तुम्हाला हलकं आणि आनंदी वाटेल.

– व्यायाम किंवा शक्य नसेल व्यायाम तर रोज चालायला सुरुवात करा. यामुळं मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते. कारण यामुळं हॅप्पी हार्मोन्सही रिलीज होतात.

– जास्त तळलेले पदार्थ टाळून फळं आणि भाज्यांचं सेवन करा. यामुळं तुम्ही निरोगी रहाल.

– संतुलित आहार आणि व्यायाम करूनही ही समस्या दूर झाली नाही तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.