न विसरता खा 2 केळी, अशी होईल कमाल! जाणून घ्या ‘हे’ 5 फायदे

दिवसभरात अनेक कामं करताना तसेच ऑफिसचे काम करताना थकवा येतो. यासाठी एनर्जीची गरज असते. ही एनर्जी मिळवण्यासाठी नाश्त्यात किंवा जेवणानंतर केळीचा आहारात समावेश जरूर करा. केळी बाराही महिने उपलब्ध असल्याने त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. केळी खाल्ल्याने कोणते फायदे होतात, आणि त्यामध्ये कोणते घटक असतात ते जाणून घेवूयात.

केळ्यात काय आहे
1 प्रोटीन
2 कार्बोहायड्रेट्स
3 फायबर
4 कॅल्शिअम
5 आयर्न
6 मॅग्नेशिअम
7 पोटॅशिअम
8 सोडियम
9 व्हिटॅमिन सी
10 फोलेट आणि व्हिटॅमिन ई

हे आहेत फायदे

1 एका केळ्यातून 89 किलो कॅलरींची एनर्जी मिळते.
2 केळ्यातील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ही तत्व मेंदूची कार्यक्षमता वाढवतात.
3 काम करण्याची क्षमताही वाढते. कामाचा कंटाळा येत नाही.
4 केळी त्वचेला उजळवण्याचं काम करते.
5 हृदयासंबंधी काही समस्यांमध्ये केळ्यातील पोटॅशिअमचा फायदा होतो.