काम करताना एनर्जी रहात नाही ? कामाचा कंटाळा येतो ? रोज खा फक्त 2 केळी अन् बघा कमाल !

पोलिसनामा ऑनलाइन – जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि दिवसभर बसून एनर्जी राहात नसेल तर नाष्यात किंवा जेवणानंतर आहारात केळीचा समावेश करा. यानं खूप फायदा मिळेल. ऑफिस वर्कमध्येही तुम्ही दमत असाल तरीही याचं सेवन करू शकता. यामुळं शरीराला भरपूर एनर्जी मिळते.

एका केळीत 89 किलो कॅलरींची एनर्जी असते. यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, व्हिॅटमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन ई असे भरपूर तत्व असतात. यामुळं शरीराला पुरेसं पोषणही मिळतं आणि एनर्जीदेखील मिळते.

केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई मुळं मेंदूची कार्यक्षमता वाढते. यामुळं काम करण्याची क्षमताही वाढते. जर वर्क फ्रॉम होम करून कंटाळला असाल तर केळी खाल्ल्यानं कामात लक्षही लागेल. कामाचा अजिबात कंटाळा येणार नाही.

केळीच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर याचा त्वचेलाही खूप फायदा मिळतो. कारण यात मॅग्नीज भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी अँटी ऑक्सिडंट्सच्या रुपात काम करतं आणि त्वचा उजळण्यास मदत होते. केळीत असणाऱ्या पोटॅशियममुळं हृदयासंबंधी समस्येतही खूप फायदा होतो. तुम्ही कोणत्याही रुपात याचं सेवन करून फायदा मिळवू शकता.