काळ्या चण्याचे ‘हे’ 6 मोठे फायदे !

पोलीसनामा टीम –  आज आपण काळ्या चण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. अनेकांना या बद्दल माहिती नाही. जर तुम्हाला याचे फायदे कळाले तर तुम्हीही याचं सेवन सुरू कराल.

1) पोषक घटक – काळ्या चण्यात क्लोरोफिल, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी तसंच फॉस्फरस असतं. यामुळं शरीराला आवश्यक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळतं. या चण्यांचा ग्लाईसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. जर तुम्हाला परफेक्ट बॉडी हवी असेल तर तुम्ही या चण्यांचं सेवन करायला हवं. काळे चणे गुळासोबत खाल्ले तर जास्त फायदा होतो. शरीराला जास्त ऊर्जा मिळते.

2) पचनक्रिया सुधारते – काळ्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. यामुळं तुमची पचनक्रिया चांगली राहते. चणे रात्री भिजवून जर सकाळी खाल्ले तर अधिक फायदा होतो. या चण्याचं पाणीही तुम्ही पिऊ शकता. यामुळं पोट साफ होण्यास मदत होते.

3) हृदयांच्या आजारात लाभ – काळ्या चण्यात अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळं हृदय रोगांपासून बचाव करण्यास मदत होते. यामुळं हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक पासूनही बचाव होतो.

4) डायबिटीस –डायबिटीसच्या रुग्णांना याचा विशेष लाभ होतो. यात असणाऱ्या कार्बोहायड्रेटमुळं शरीरात संतुलन राहतं. रक्तातील साखरेची पातळीही व्यवस्थित राहते. यामुळं डायबिटीस टाईप 2 चा धोका कमी होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

5) गरोदर महिला – गरदोर महिला किंवा बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांना याचा खूप फायदा होतो. यातील आयर्न अॅनिमिया रोखण्यासाठी मदत करतं.

6) त्वचेसाठी फायदा – काळ्या चण्यांचा शरीरासह त्वचेलाही खूप फायदा होतो. चणे भिजवलेल्या पाण्यानं चेहरा धुतला तर चमकदार दिसतो. यामुळं कोरडेपणा दूर होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like