गाजर खाण्यानं तरूण दिसण्यासह मिळतात ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन – गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि एल्केलाईन भरपूर असतं. याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. डोळ्यांना याचा विशेष फायदा होतो हे तर सर्वानाच माहित आहे. आज आपण गाजर खाण्याचे इतर फायदे जाणून घेणार आहोत.

1) मजबूत हिरड्या – गाजर खाताना लाळेची जास्त निर्मिती होते. यामुळं दातं स्वच्छ आणि निरोगी राहतात. हिरड्याही मजबूत होण्यास मदत होते.

2) डोळे – व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतं. गाजरात बीटा कॅरोटीन असतं. हे लिव्हरमध्ये जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रुपांतरीत होतं. हे प्रोटीन सेल्समध्ये मिश्रित होतं आणि यामुळं डोळ्यांची दृष्टी वाढते. याच्या सेवनानं रात आंधळेपणाही दूर होतो.

3) रंग उजळतो – गाजराच्या सेवनानं अनेक रोगांपासून बचाव तर होतोच शिवाय त्वचेची सुंदरता ही वाढते. यातील एल्केलाईन या गुणधर्मामुळं रक्त शुध्द होतं. यामुळं त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात.

4) वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो – कमी वयातच अनेक महिला वयस्कर वाटतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. जर तुम्हालाही अशा समस्या असतील तर तुम्ही गाजराचं सेवन करायला हवं. तुम्ही याचं सेवन कोणत्याही प्रकारे करू शकता. यामुळं त्वचेवरील वाढत्या वयाच्या खुणा दूर होतात. गाजराच्या सेवनानं शरीरात रक्तही वाढतं.