गाजराचे ‘हे’ आहेत फायदे, आरोग्यासाठी खुपच फायदेशीर, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी डॉक्टर्स नेहमी सांगत असतात की, पालेभाज्या आणि फळभाज्या अधिक प्रमाणात खा. तसेच त्यामध्ये ‘गाजर’ देखील अधिक खावे. कारण, ‘गाजर’मध्ये अनेक पोषकतत्त्वे आहेत जी आपल्या शरीराला आवश्यक असतात. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या फळांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तर, मग जाणून घेऊयात गाजराविषयीची माहिती आणि गाजराचे आरोग्यदायी फायदे.

सध्या बाजारात गाजराचे प्रकार अथवा त्याच्या जातीनिहाय गाजर पहायला मिळत आहे. अर्थात लहान आणि मोठे गाजर. सध्या गाजराची मागणी वाढल्यामुळे गाजराचे नवनवीन वाण देखील शेतकर्‍यांनी लावल्याचे पहायला मिळते. वेगवेगळ्या वाणनुसार गाजरामध्ये असणार्‍या जीवनसत्त्वे आणि आवश्यक घटक याचे प्रमाणदेखील भिन्न असते.

सध्या या दिवसात वेगवेगळ्या फळांचं उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या फळांचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स नेहमी देतात. या फळांसोबतच गाजर खाण्याचा सल्ला देखील आवार्जुन दिला जातो. गाजराचे आरोग्याला अनेक प्रकारे फायदे होतात. खासकरून डोळ्यांसाठी गाजर अधिक फायदेशीर आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि एल्काइन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नियमित गाजराचे सेवन केल्यास आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि एल्काइन मिळेल आणि आपली दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल. डोळ्यांसाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्वे गाजरामध्ये अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे डोळे निरोगी राहण्यासाठी आवश्यक गाजर खाणे फायदेशीर ठरते.

1) हिरड्या होतात मजबूत
दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी गाजर खाणे योग्यच. गाजर जेव्हा तुम्ही चावता तेव्हा याने दातांच्यामध्ये फसलेला अन्न बाहेर निघते. तसेच याने लाळेची निर्मितीही अधिक होते. गाजर खाल तर दात आणि हिरड्यांचेही आरोग्य चांगले राहतं. त्यामुळे हिरड्या मजबूत राहतात.

2) दृष्टी चांगली राहते
डोळ्यांसाठी आवश्यक असते ते म्हणजे व्हिटॅमिन ए. याचं प्रमाण गाजारामध्ये अधिक प्रमाणात असतं. म्हणून डॉक्टर्स गाजर खाण्याचा सल्ला अधिक वेळा देतात. त्यासोबतच गाजरात बीटा-कॅरोटीन देखील असते. हे लिव्हरमध्ये जाऊन व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होते. हे प्रोटीन सेल्समध्ये मिश्रित होतात अन् डोळ्यांची दृष्टी वाढविते. त्यामुळे गाजराच्या सेवनाने रात आंधळेपणापासूनही बचाव होण्यास मदत होते.

3) त्वचेसाठी फायदेशीर
गाजर त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गाजरामध्ये असलेले मिनरल्स तत्व अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करतात. तसेच शारीरिक आणि त्वचेची सुंदरता देखील वाढवतात. यात असलेल्या एल्केलाइन गुणांमुळे शरीरातील रक्त शुद्ध होतं. त्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधी समस्यांपासूनही सुटका मिळण्यास मदत होते.

4) वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो
कमी वयातच अनेकदा महिलांच्या त्वचेवर वृद्धपणाची लक्षणे दिसतात. यासोबतच सुरकुत्याही वाढतात. जर तुम्हाला या समस्या असतील तर तुम्ही गाजर खायला हवे. गाजर तुम्ही तसंही खाऊ शकता किंवा ज्यूसही घेऊ शकता अर्थात गाजरातील व्हिटॅमिन्स तुमच्या शरीरात गेले पाहिजेत. गाजराने वाढत्या वयाच्या खूणा त्वचेवरून दूर होतात. तसेच गाजराचा ज्यूस प्यायल्याने शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.

गाजराचे आरोग्याला होणारे फायदे समजल्यानंतर आपण गाजर खाण्यावर अधिक भर द्याल, यात शंका नाही. याबाबत अधिक माहिती किंवा शंका असल्यास आपल्या डॉक्टर्स यांच्याशी संपर्क साधा.