वजन कमी करण्यासह मूग डाळीच्या पाण्याचे ‘हे’ 5 फायदे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मुगाची डाळ बहुतेक लोकांना आवडते. मूग डाळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. याशिवायत यात मॅग्निज पोटॅशियम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिनसारखे पोषक तत्व असतात. या डाळीचं सेवन केलं शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. डाळीसोबतचं मुगाच्या डाळीच्या पाण्याचं जर तुम्ही सेवन केलं तर याचेही खूप फायदे होतात. चक्क डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही या पाण्यानं कमी केला जाऊ शकतो. आज आपण मुगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची योग्य पद्धत आणि याचे फायदे जाणून घेणार आहोत.

मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्वांचं प्रमाण

1 कप मूग डाळ पाण्यात 14 ग्रॅम प्रोटीन, 1 ग्रॅम फॅट, 15 ग्रॅम फायबर, 321 मायक्रोग्रॅम फॉलेट, 4 ग्रॅम शुगर, 55 मिली कॅल्शियम, 97 मिली मॅग्नेशियम, 7 मिली झिंक असतं. याशिवाय या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी 1, बी 5, बी 6, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टंट स्टार्चही भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. यामुळं तुम्ही अनेक वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.

कसं बनवाल मूग डाळीचं पाणी ?

– मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये 2 कप पाणी गरम करा
– या गरम पाण्यात मूग डाळ टाका.
– आता यात चवीनुसार मीठ टाकून 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
– यानंतर डाळ बारीक करा.
– आता यातील पाणी वेगळं काढा
– आता तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयारआहे.

काय आहेत मूगाच्या डाळीच्या पाण्याचे फायदे ?

1) लठ्ठपणा कमी करण्यासाठी – अनियमित जीवनशैली आणि अवेळी खाणं यामुळं लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळं लठ्ठपणाची समस्या सर्वात जास्त दिसून येत आहे. जर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या असेल आणि तुम्ही यामुळं हैराण असाल तर तुम्ही मुगाच्या डाळीच्या पाण्याचं सेवन करू शकता. या पाण्यात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि फायबर अधिक असतात. याशिवाय मूग डाळीच्या पाण्यानं मेटाबॉलिजम बूस्ट होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

2) बॉडी डिटॉक्स होते – मूग डाळीच्या पाण्याचं जर नियमितपणे सेवन केलं तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास याची खूप मदत होते. यानं शरीराची आतून स्वच्छता होते. याशिवाय डाळीचं पाणी पिल्यानं लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.

3) डायबिटीज – मूग डाळीचं पाणी शरीरात इंसुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय मूग डाळीमुलं ग्लुकोजही नियंत्रणात राहतं. यामुळं डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

4) डेंग्यू – डास चावल्यानं होणारा हा एक गंभीर आजार आहे. आजवर अनेकांना हा आजार झाला आहे. जर तुम्ही मुगाच्या डाळीच्या पाण्याचं सेवन केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. या डाळीच्या पाण्याच्या सेवनानं इम्युन सिस्टीमही मजबूत होते. डेंग्यू सारख्या गंभीर आजारापासूनही यामुळं बचाव केला जाऊ शकतो.

5) लहान मुलांसाठी फायदेशीर – मूग डाळीच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात जे मुलांसाठीही जास्त फायदेशीर असतात. सर्वात खास बाब अशी की, या डाळीचं पाणी सहज पचतं. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही याचा खूप फायदा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.