‘या’ 5 घरगुती उपायांनी कायमची दूर करा कोंड्याची कटकट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  डोक्याच्या त्वचेला योग्य पोषण न मिळाल्यानं तिथली त्वचा निर्जीव होऊ लागते. यामुळंच केसात कोंडा तयार होतो. अनेकांनी ही समस्या असते. आज आपण यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) तेल – गरम कॅस्टर ऑईल, कोकोनट ऑईल आणि तिळाचं तेल प्रत्येकी 1 चमचा घ्या. यात 2 ते थेंब सेडर वुड ऑईल टाका. आता हे मिश्रण डोक्याच्या त्वचेला आणि केसांना नीट लावा. अर्ध्या तासानं शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करावा. जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर एकदाच याचा उपयोग करावा.

2) दही आणि लिंबू – दोन चमचे दही घ्या. त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि सेडर वुड ऑईल टाका. यात 2 चमचे उडदाची डाळ बारीक करून टाका. हे मिश्रण डोक्याला लावा. 10 मिनिटांनंतर एखाद्या हर्बल शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून किमान एकदा हा प्रयोग करावा. हे उपाय करूनही कोंडा जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे फंगल इंफेक्शनचही कारण असू शकतं.

3) आलमंड ऑईल आणि गुलाब जल – आलमंड ऑईल आणि गुलाब जल एकत्र करून केसांना मालिश करा. अर्ध्या तासानं केस धुवा.

4) गरम तेल – जोजोबा ऑईल, कॅस्टर ऑईल, सोया व्हेजिटेबल ऑईल असं प्रत्येकी एक चमचा घ्या. यात एक तेजपत्ता टाकून गरम करा. हे मिश्रण गाळून घ्या त्यात 2 थेंब सँडलवुड ऑईल आणि दोन थेंब लॅवेंडर ऑईल टाका. रोज रात्री झोपण्यापूर्वी या तेलानं मालिश करा. सकाळी केस शॅम्पूनं धुवा.

5) पाणी आणि तेजपत्ता – 1 ग्लास पाण्यात एक तेजपत्ता टाकून हे पाणी उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून त्यात 2 थेंब लॅवेंडर ऑईल आणि 2 थेंब लिंबाचा रस टाकून मिक्स करा. रोज झोपताना हे मिश्रण लावून डोक्याची मालिश करा. सकाळी शॅम्पूनं केस धुवा.