‘असा’ वाचवा पार्लरच्या थेरपीचा खर्च, जाणून घ्या मुगाच्या डाळीच्या वापराचे चमकदार त्वचेसह ‘हे’ 5 मोठे फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी घरात असणाऱ्या मुगाच्या डाळीचा वापर कसा करायचा हे आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला मुग डाळीचा फेस पॅक तयार करायचा आहे. तो कसा करायचा आणि कधी लावायचा हे जाणून घेऊयात.

साहित्य- मूग डाळ, गुलाब पाणी, मध, बदामाचं तेल.

फेस पॅकसाठी पुढील कृती करा-

– रात्री गुलाब पाण्यात मुगाची डाळ भिजवत ठेवा
– सकाळी पाणी बाजूला करून डाळीची पेस्ट तयार करा.
– यात आता मध घाला.
– आता यात बदामाचं तेल घाला
– आता हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावा.
– 20 मिनिटांनी चेहरा सुकल्यानंतर चहेरा धुवून टाका.

काय आहेत फायदे ?

– साईड इफेक्ट्स होत नाहीत
– त्वचा मॉईश्चराईज होते
– त्वचेला ग्लो येतो
– डेड स्कीन सेल्स दूर होतात
– त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसते.