कपाळावर सुरकुत्या दिसतात ? ट्राय करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वाढतं वय आणि तणाव यांच्यामुळं कपाळावर सुरकुत्या येतात. यामुळं तुम्ही जास्त वयस्कर दिसून लागता. महिलांचा लुकही यामुळं बिघडून जातो. महिला चेहऱ्याबद्दल जास्त जागरूक असतात. यासाठी काही लोक कॉस्मेटीक सर्जरीचा आधार घेतात. परंतु याचे साईड इफेक्ट्सही होतात. जर तुम्हाला या सुरकुत्या दूर करायच्या असतील तर यासाठी आपण काही सोपे घुरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) पपई – वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी पपई फार फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये पॅपेन नावाचं एंजाईम असतं. यामुळं कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत होते. यासाठी एक चमचा पपईचा गर काढून तो कपाळावर लावा आणि स्क्रब करा. काही वेळानं चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केला तर कपाळावरील सुरकुकत्या कमी होतात.

2) खोबरेल तेल – यामुळं स्किन मॉईश्चराईज होते. यात असणारे अँटी ऑक्सिडंट्स त्वचेला निर्जीव करणाऱ्या आणि सुरकुत्याचं कारण असणाऱ्या अॅक्टीविटी कमी करतात. यासाठी या तेलाचे काही थेंब घेऊन कपाळावर मालिश करा. त्वचा तेल शोषत नाही तोपर्यंत मालिश करत रहा. काही वेळातच त्वचा तेल शोषून घेते.

3) ऑरेंज पील पावडर – कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी सिट्रस फेसपॅक लाभदायक मानले जातात. यासाठी एक चमचा ऑरेंज पील पावडर आणि 1 चमचा गुलाब जल मिक्स करा. हा फेसपॅक साधारण 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर पाण्यानं चेहरा स्वच्छ करा.

4) ऑलिव्ह ऑईल – यात त्वचेसाठी फायदेशीर व्हिटॅमिन ई आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळं कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत होते. यासाठी 1 चमचा ऑलिव्ह ऑईलनं कपाळावर मसाज करा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ करून घ्या.

5) अननस – अननसात ब्रोमेलिन आणि व्हिटॅमिन असतात. यामुळं कपाळावरील सुरकुत्या दूर होतात. यासाठी अननसाचा ताजा रस घ्या. कापसाच्या मदतीनं हा रस कपाळावर लावा. 15 मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं धुवून काढा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.