काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या ‘या’ नेत्याच्या उदाहरणामुळे काँग्रेसने राज्यात शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाशिवआघाडी दावा करत आहे. हे सर्व पक्ष वैचारिकदृष्ट्या आणि राजकीय मुद्यांच्या दृष्ट्या विरोधक आहेत. परंतू आता यावर चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील आणि बाहेरील काही काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेबरोबर हात न मिळवण्यास सांगितले. काँग्रेस कार्यकारी समितीपासून केरळपर्यंतच्या नेत्यांनी या आघाडीला विरोध केला. त्यांचे म्हणणे आहे की या आघाडीचा परिणाम विधानसभा निवडणूकीवर होईल आणि पक्षाच्या राजकारणावर देखील होईल. या गोष्टीवर काँग्रेस नेत्यांच्या विविध स्तरावर चर्चा झाली. राज्यातील काही काँग्रेस नेत्यांचे देखील यावर एकमत नाही.

शिवसेनेला दिले होते सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी 24 तास
शिवसेनेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी 24 तासाचा कालावधी दिला होता. परंतू या दरम्यान शिवसेनेला ही वेळ पाठिंब्याचे पत्र मिळवण्यासाठी अपुरी ठरली. कारण वेळ संपत आला होता तरी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा अथवा नाही यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींत एक मत होत नव्हते. कारण या दरम्यान दिल्लीत दिवसभर बैठकांचे सत्र सुरु होते आणि हायकमांडच्या निर्णयावरुन सर्व काही अडून होते. या दरम्यान काँग्रेसमधील राज्यातील गदारोळ थांबत नव्हता. त्यातील काही वरिष्ठ नेते सत्ता स्थापन करावी यासाठी पक्षावर दबाव आणत होते. सत्ता स्थापनेची चर्चा वेगवान झाली. हे सर्व एका व्यक्तीचे उदाहरण देत करण्यात आले.

सत्तारांमुळे काँग्रेस सिल्लोड मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर ढकलली गेली
मराठवाड्यातील सिल्लोड मतदार संघातील माजी पशुपालन मंत्री अब्दुल सत्तार यांना औरंगाबादमधून पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने लोकसभा निवडणूकीआधीच काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी भाजपात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं होतं. परंतू अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभेची निवडणूक त्यांनी अत्यंत सहज जिंकली. त्यामुळे काँग्रेस तिसऱ्या स्थानावर गेली.

सत्तार यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे होते. ज्यांना 90 हजार मते मिळाली. ते दुसऱ्या स्थानी राहिले. काँग्रेसने सरकार बनवण्याचा विचार केला तेव्हा सत्तार यांचे उदाहरण देण्यात आले. काँग्रेसने मागील काही काळापासून राजकीय चूका केल्या आहेत. ज्याचा फटका काँग्रेसला बसला. आता राजकारणात सांप्रदायिक विरुद्ध धर्मनिरपेक्ष हे विभाजन अप्रासंगिक झाले आहे. एका काँग्रेस नेत्याने सांगितले की एक मुस्लिम आणि माजी काँग्रेस नेते शिवसेनेत सहभागी झाला आणि अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात सहज विजय मिळाला. यावर हे स्पष्ट झाले की राजकारणात कशा प्रकारे बदल झालेत.

काँग्रेस आमदारांमध्ये अंतिम निर्णयामुळे धाकधुक
शिवसेनेबरोबर एकत्र येऊन सरकार बनवण्यावर एक तर्क दिला. काँग्रेस नेत्यांचे म्हणले आहे की पक्षाच्या आमदारात सरकार बनवून सत्तेत राहणार की पाच वर्षापर्यंत विरोधात बसून राहणार. भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटक सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कारणाने काँग्रेस राज्यात शिवसेनेत जाण्यास तयार झाली. परंतू अजूनही पाठिंबा पत्र देण्यात आले नाही. परंतू आता काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवण्याच्या शक्यता पडताळत आहेत.

Visit : Policenama.com