हातांवरील चरबी किंवा लटकलेलं मांस कमी करण्यासाठी ‘असं’ करा Home Workout !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जास्त करून महिलांना वजन वाढीची समस्या असते. कारण ऑफिस आणि घरातलं काम करताना त्यांचं आरोग्यकडे जास्त दर्लक्ष होतं. यात डोकेदुखीचा भाग असतो तो म्हणजे आर्म फॅट म्हणजेच हातावरील चरबी. यामुळं स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. आता तुम्ही घरीच हातावरील लटकलेलं मांस किंवा जास्तीची चरबी दूर करू शकता. यासाठीचा व्यायाम आपण जाणून घेणार आहोत.

1) बटरफ्लाय – या व्यायामाच्या मदतीनं तुम्ही हातांसोबत शरीराच्या इतर भागांरील चरबीही कमी करू शकता. यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– सरळ रेषेत उभे रहा.
– दोन्ही हात समोर उभे करा.
– हात खांद्याच्या रेषेत सरळ आणून तळवे जमिनीकडे करा.
– आता हात घडाळाच्या काट्याप्रमाणे फिरवा.
– आता अँटीक्लॉकवाईज फिरवा.
– असं किमान 15-20 वेळा करावं

2) ट्रायसेप्स डिप्स – हाताचं लटकेलं मांस कमी करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. यासाठी पुढील प्रणाणे क्रिया करा.

– एका खुर्चीवर बसा
– दोन्ही हात खुर्चीच्या किनाऱ्यावर ठेवा
– आता पाय समोर घ्या
– आता शरीर पुढे घेऊन वजन टाचांवर आणि हातांवर बॅलन्स करा.
– आता हळूहळू जमिनीकडे जा आणि ट्रायसेप्सच्या मदतीनं शरीर वर उचला.
– पुन्हा खाली जा पुन्हा वर या.
– ही क्रिया हळू हळू झाली पाहिजे.
– आधी याचे 3 सेट करून रोज क्षमतेनुसार यात वाढ करा.