वजन कमी करायचंय ? दिवसभरात खा ‘एवढ्या’ चपात्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण वजन कमी करण्यासाठी कमी डाएट घेतात. अशात त्यांचं चपातीचं सेवनही कमीच असतं. परंतु किती चपात्या खाणं फायदेशीर ठरतं हे अनेकांना माहित नाही. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

एका चपातीतून मिळतात ही पोषकतत्वे

गव्हाच्या पीठाच्या एका चपातीत मॅक्रो न्युट्रीएंट्स मुबलक प्रमाणात असतात. यात प्रोटीन आणि फायबरदेखील असतं. जर एक व्यक्ती साधारणपणे 6 इंचाची चपाती खात असेल तर त्या व्यक्तीला 15 ग्रॅम कार्ब्स मिळतात आणि 3 ग्रॅम प्रोटीन मिळतं, तर 0.4 ग्रॅम फायबर.

किती चपात्या खाणं फायदेशीर ठरतं ?

एखाद्या व्यक्तीच्या शरीराला किती कार्ब्सची गरज आहे यावरून त्यानं किती चापत्या खाव्यात हे ठरतं. दूध, सोडा, साखर तेल अशा पदार्थांमध्येही कार्ब्स असतात. जर तुम्ही या पदार्थांचंही सेवन करत असाल तर चपातीचं सेवन कमीच करा.

जर वजन कमी करत असाल तर…

जर महिलांना त्यांच्या डाएटमध्ये 1400 कॅलरीज घेणं आवश्यक असेल तर त्यांनी दुपारच्या जेवणात 2 आणि रात्रीच्या जेवणात 2 चपात्या खाणं गरजेचं असतं. पुरुषांच्या डाएट प्लॅननुसार जर 1700 कॅलरीज घेणं त्यांना गरजेचं असेल तर दुपारच्या जेवणात 3 आणि रात्रीच्या जेवणात 3 चपात्या खाणं फायदेशीर ठरतं.

चपाती कधी खाणं उत्तम ठरतं ?

तसं तर तुम्ही लंच आणि डिनरमध्ये चपाती खाऊ शकता. परंतु एक्सपर्ट सांगतात की, दिवसा चपाती खाणं उत्तम ठरतं. कारण यातील फायबर पचनक्रिया स्लो करतं. रात्री जर चपाती खाल्ली तर झोपल्यानंतरही पचनक्रिया सुरूच राहते. हे शरीरासाठी चांगलं नसतं. जर दिवसा चपाती खाल्ली तर दिवसभरातील ती सहज पचण्यास अॅक्टीविटीमुळं पचण्यास मदत होते.

भातापेक्षा चपाती उत्तम

चपातीत व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, बी 3, कॅल्शियम आणि आयर्न असतं. एका चपातीत एक कप भातापेक्षा जास्त फायबर असतात. याचा पचनक्रियेला फायदा होतो.

भात आणि चपातीमध्ये राखावा समतोल

तसं तर चपातीचा शरीराला फायदा होता. परंतु आहारात दोन्ही पदार्थांचा समतोल राखणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु प्लेन राईस शक्यतो टाळायला हवा. भात डाळींसोबत किंवा भाज्यांसोबत खाणं जास्त फायदेशीर ठरतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते.