केस गळतीनं परेशान आहात ? सुंदर अन् लांब केसांसाठी ‘असा’ करा मोहरीच्या तेलाचा वापर ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्हाला केसगळती थांबवायची असेल आणि सुंदर काळे लांब केस हवे असतील तर यासाठी मोहरीचं तेल खूप फायदेशीर ठरतं. परंतु अनेकांना ते लावण्याची योग्य पद्धत माहित नसते. आज आपण यासंदर्भातच माहिती घेणार आहोत.

1) रोज नव्हे फक्त दोन दिवस करावी मालिश – अनेकजण असं सांगतात की, रोज मोहरीच्या तेलानं केसांची मालिश करावी. परंतु असं नाहीये. आठवड्यातून फक्त दोनच दिवस या तेलानं मालिश करावी. यासाठी त्या 2-3 लसणाच्या कळ्या टाकून हे तेल गरम करून घ्यावे. तेल थंड झाल्यानंतरच केसांना लावावं.

2) मोहरीच्या तेलात हिना मेहंदीची पानं भिजवून हे तेल केसांना लावलं तरीही केस मजबूत होतात. आयुर्वेदातही याच्या वापराबद्दल सांगितलं आहे.

3) केसांना मोहरीचं तेल लावल्यानंतर 3-4 तास तसं राहू द्या. नंतर शॅम्पूनं केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन दिवस ही क्रिया करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसेल.

4) ज्यांना कोंड्याची सम्सया आहे त्यांनाही मोहरीच्या तेलाचा खूप लाभ होतो. यात बीटा कॅरोटीन, फॅटी अॅसिड, आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. यामुळं केसांची वाढ चांगली होते.

5) मोहरीच्या तेलात अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळं डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं. इंफेक्शनपासून बचाव होतो. केस वाढण्यास याची खूप मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची त्वचा आणि केस वेगळे असतात. त्यामुळं काही पदार्थ काहींना त्वचेला सुट करतात तर काहींना नाही.