‘डिलीट’ झालेले Whatsapp मेसेज ‘या’ पद्धतीने वाचा, जाणून घ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – इन्स्टंट मॅसेजिंग ऍप असणाऱ्या व्हाट्सअपमध्ये ग्राहकांना नवीन फीचर्स पाहायला मिळतात. जगभरातील ग्राहकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे ऍप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा वापर असल्याने त्यावर सतत मॅसेज देखील येत असतात. त्यामुळे अनेकदा हे मॅसेज डिलीट करताना मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे युजर एकावेळी सर्वच मॅसेज डिलीट करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये काही महत्वाचे मॅसेज डिलीट होत असतात. त्यानंतर ते पुन्हा कसे वाचायचे हा मोठा प्रश्न युजर्सना पडतो. मात्र काही पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्हाला पुन्हा हे मॅसेज मिळू शकतात.

खालील पद्धत वापरून पुन्हा मिळवा मॅसेज –

आपल्याला येणारे मॅसेज हे फोनच्या मेमरीमध्ये स्टोर होत असतात. मात्र डिलीट झालेलं हे मॅसेज तुम्ही अ‍ॅपच्या रिकव्हरी फीचरच्या मदतीने पुन्हा मिळवू शकता. चॅट हिस्ट्री हा ऑप्शन व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरवर नसतो. त्यामुळे हे बॅकअप तुम्हाला रिकव्हरी फीचरच्या मदतीने मिळू शकते. तुम्ही जर चुकून तो मॅसेज डिलीट केला तरी तुम्हाला तो व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट बॅकअपमध्ये सहज मिळू शकतो. जर तुम्ही योग्य वेळी हे मॅसेजचे बॅकअप घेतले असेल तर तुम्हाला तुमचे डिलीट झालेलं मॅसेज परत मिळवण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रत्येक आठवड्यात बॅकअप घ्यावा लागतो. यासाठी गुगल स्टोरवर अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे मॅसेज पुन्हा मिळवू शकता.

दरम्यान, या पद्दतीचा अवलंब करण्यासाठी तुमच्याकडे थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज आहे. हे थर्ड पार्टी अ‍ॅप तुमचे आलेले आणि पाठवलेले दोन्ही मॅसेज स्टोर करून ठेवत असते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे मॅसेज परत मिळवू शकता, मात्र हि पद्धत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे महत्वाचे मॅसेज सांभाळून ठेवावेत जेणेकरून तुम्हाला अशाप्रकारच्या कोणत्याही अ‍ॅपचा वापर करण्याची गरज पडणार नाही.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like