चष्म्यामुळं चेहर्‍यावर पडलेले डाग ‘या’ 5 मार्गाने करा दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोक डोळ्यांच्या समस्यांमुळे चष्म्याचा वापर करतात. मात्र, सातत्याने चष्मा लावल्याने नाकावर व्रण उठतात. अनेकवेळा चष्म्यामुळे उद्भवलेले हे डाग डोकेदुखी ठरतात. उपाय करुनही हे डाग दूर होत नाहीत. अनेकदा बाजरात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स वापरुन सुद्धा चेहऱ्यावरचे डाग तसेच राहतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करुन तुम्ही हे डाग दूर करु शकता.

१. मध

मधाचा उपयोग चष्म्याच्या खुणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. डाग असलेल्या त्या ठिकाणी काही थेंब मध लावा. मध आणि लिंबू मिक्स करुन सुद्धा तुम्ही लावू शकता. तसेच मुलतानी मातीच्या वापराने चेहरा उजळ होतो. डाग कमी होतात.

२. बटाटा

त्वचेसाठी आवश्यक असलेले गुणधर्म बटाट्यामध्ये असतात. त्यासाठी एका कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या आणि १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून ३ ते ४ वेळा केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

३. कोरफड

कोरडफडचा वापर करण्यापूर्वी आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. परत कोरफड जेल हातात घेऊन डोळ्याच्या आजूबाजूला लावून गोलाकार फिरवा. त्यामुळे चष्म्याच्या वापरामुळे आलेले डाग निघून जाण्यास मदत होईल.

४. गुलाबपाणी

चेहऱ्याची सुंदरता वाढवण्याची गुलाबपाण्याच्या उपयोग करण्यात येतो. कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

५. टोमॅटो

व्हिनेगर आणि टोमॅटोच्या साहाय्याने डाग कमी करण्यास मदत होते. हे पदार्थ त्वचेवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डाग असलेल्या ठिकाणीच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. दररोज हे पदार्थ डागांवर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका.