‘पटौदी पॅलेस’ परत मिळवताना सैफ अली खानच्या आले होते नाकी नऊ, किंमत देखील तितकीच मोठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा नवाब घराण्यातील आहे. पटौदीचा नवाब सैफ अली खान याच्याकडे परिवाराची मोठी संपत्ती आहे. त्याचा पटौदी पॅलेस प्रसिद्ध असून त्याला इब्राहीम कोठी असं म्हटलं जातं. तो एकमेव अभिनेता आहे ज्याच्याकडे अशा प्रकारचा महाल आहे. हरियाणामधील गुडगांव जवळ हा महाल असून हा महाल पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात. परंतु हा महाल परत मिळवण्यासाठी सैफला खूप कष्ट करावे लागले होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृ्तानुसार, एका हॉटेल चेनला हा पटौदी महाल भाड्याने दिला गेला होता. त्यानंतर त्याने वडील मंसूर अली खान पटौदी यांच्या निधनानंतर सैफने हा महाल पुन्हा सजवला. याचसंबंधी एक आठवण सांगताना मुलाखतीमध्ये त्याने सांगितले, हा महाल परत मिळवण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले होते. त्याने सिनेमात पैसा कमावून ही कोठी परत मिळवली होती.या कोठीसोबत त्याच्या आयुष्यातील आणि परिवाराच्या अनेक आठवणी जुळल्या असल्याचे देखील त्याने या मुलाखतीत सांगितले. तो म्हणालाा की, हे खरंच आहे की, तो एका श्रीमंत घरात जन्माला आला. पण आपल्या परिवाराचा इतिहास, संस्कृती आणि ही सुंदर प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली.

दरम्यान, हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टच्या ‘इट प्रे लव्ह’ सिनेमाचं शूटींग याच पॅलेसमध्ये झालं. त्यासोबतच ‘मंगल पांडे’, ‘वीर झारा’, ‘गांधी: माय फादर’ आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या सिनेमांचं शूटींगही याच पटौदी पॅलेसमध्ये झालं होतं. हा महाल खूप मोठा असून पटौदी पॅलेस १० एकर परिसरात बांधला आहे. यात तब्बल १५० रूम्स आहेत. ज्यात ७ ड्रेसिंग रूम्स, ७ बेडरूम्स, ७ बिलियर्ड रूम्ससोबत ड्रॉइंग रूम आणि डायनिंग रूमही आहेत. या प्रॉपर्टीची एकूण किंमत तब्बल ८०० कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे.

You might also like