कामाची गोष्ट ! ‘या’ 6 स्टेप्स फॉलो करून काही मिनीटातच PF अकाऊंटमध्ये UAN नंबर अॅक्टिव्ह करा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या EPF खात्याशी संबंधित विविध प्रकारच्या माहिती आणि सेवांबद्दल जाणून घेण्यासाठी, आपला युनिव्हर्सल आयडेंटिफिकेशन नंबर (UAN) नंबर सक्रिय करणे महत्वाचे आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपल्याला विविध प्रकारच्या सेवा प्रदान करते ज्या यूएएन नंबर सक्रिय झाल्यानंतरच वापरल्या जाऊ शकतात. या सेवांमध्ये आपल्या ईपीएफ खात्यात नामनिर्देशन, कर्मचारी निवृत्तीवेतन योजना म्हणजे ईपीएस मधील नामांकन, ऑनलाइन दावा दाखल करणे आणि ईपीएफ पासबुकमध्ये प्रवेश करणे यांचा समावेश आहे.
ईपीएफओ सर्व्हिस पोर्टल (Sewa Portal) वर या सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर असणे आवश्यक आहे. प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचार्याची ईपीएफ मेंबर आयडी बनवते जेणेकरून त्या कंपनीच्या वतीने पीएफची रक्कम जमा करता येईल. अशा परिस्थितीत नोकरी बदलताना नवीन कंपनी तुमच्यासाठी नवीन ईपीएफ खाते उघडते. या खात्यात पीएफची रक्कम जमा केली जाते. ईपीएफ खात्यात यूएएन नंबर सक्रिय करण्याबद्दल खालील स्टेप्स फॉलो करा –
1. ईपीएफ खात्यात यूएएन नंबर सक्रिय करण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ जावे लागेल.
२. त्यानंतर, पुढच्या ‘एक्टिव्हिटी यूएएन’ या पर्यायावर क्लिक करा .
3. तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच एक नवीन वेबपेज उघडेल. या वेबपेज वर यूएएन क्रमांक, सदस्य आयडी, आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक द्यावा लागेल. यासह, आपले नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी भरणे आवश्यक आहे. येथे आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण वरील सर्व माहिती केवळ आपल्या ईपीएफओ रेकॉर्डच्या आधारावर भरता.
4. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल आणि अधिकृत पिनवर क्लिक करा.
5. त्यांनतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी भरल्यानंतर तुम्हाला ‘Validate OTP and Activate UAN वर क्लिक करावे लागेल.
6. एकदा आपला यूएएन नंबर सक्रिय झाल्यानंतर त्याचा पासवर्ड नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठविला जाईल.
- औषधोपचाराने डोकदुखी बरी होत नसल्यास असू शकतात ‘हे’ गंभीर आजार
- ‘या’ सापाचा वापर होतो चक्क ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी, जाणून घ्या
- आरोग्य समस्या दूर करण्यासाठी पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, जाणून घ्या
- तुम्ही चिकन जास्त खाता का ? ‘फर्टिलिटी रेट’ होऊ शकतो कमी, जाणून घ्या
- ‘प्रेग्नेंसी’ला बाधक ठरतात ‘ही’ १० कारणे, पुरुषही असतात जबाबदार, जाणून घ्या
- भूक लागत नाही, ‘हा’ सुद्धा आहे एक आजार, वेळीच करा ‘हे’ उपाय
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या