घर बसल्या ‘फ्री’मध्ये काढा तुमचे पॅनकार्ड ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डासोबतच पॅनकार्ड देखील खूप गरजेचे आहे. पॅनकार्ड नसल्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेता येत नाही. कोणत्याही वाहनाची खरेदी करायची असेल तर पॅनकार्ड लागतेच. असे हे अत्यावश्यक पॅनकार्ड मिळविण्यासाठी अनेक कागदपत्रांची जमवा जमव करून धावपळ करावी लागते. पण आता पॅनकार्ड मिळविणे खूप सोपे झाले आहे. आपण घर बसल्या पॅनकार्ड काढू शकतो. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

 वेबसाईटवर जाऊन असा करा अर्ज

ई पॅनकार्ड तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जावा. यानंतर क्विक लिंक्समध्ये सर्वात वरच्या भागात Instant e-PAN वर क्लिक करा. यानंतर येणाऱ्या सूचनांचे पालन करा. त्यानंतर Apply instant ई पॅन वर क्लिक करा.

 मोबाईलवर येईल OTP

करदात्याला ई पॅन आधारकार्डच्या आधारावर दिले जाईल. यामुळे आधारकार्डवर दिली गेलेली सर्व माहिती बरोबर आणि सत्य असली पाहिजे. ई पॅन आणि आधारची माहिती जुळवून तपासली पाहिजे. करदात्याला आधारकार्डशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. याच मोबाईल नंबरवर OTP येईल. हा मोबाईल नंबर व्हेरीफाईड असला पाहिजे.

 पांढऱ्या कागदावर करा सही

OTP आल्यानंतर ई KYC (know your customer) ची प्रक्रिया पूर्ण होईल. ई पॅनकार्ड काढण्यासाठी युजरला त्याच्या सहीची एक स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. एका पांढऱ्या कागदावर सही करा. याचे रेझूलेशन २०० DPI आणि साईज १० KB असली पाहिजे. २X४.५ सेंटीमीटर डाइमेंशनचा हा फोटो JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

 पाठवण्यात येईल १५ आकडी पॅनकार्ड नंबर

पेपर लेस सुविधा असल्यामुळे युजरला कोणत्याही प्रकारची हार्ड कॉपी देण्यात येणार नाही. अर्ज पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर १५ अंकी पॅनकार्ड नंबर पाठवण्यात येईल. या पॅनकार्डला केवळ व्यक्तिगत लोकच घेऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या कंपन्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

आरोग्यविषयक वृत्त – 

पृथ्वीवरील अमृत आहे गाईचे दूध, आहेत अनेक औषधी उपयोग 

तुमचे दात पिवळे तर नाहीत ना ? जाणून घ्या याची कारणे 

थोडे-थोडे खाण्याने चांगली राहते पचनक्रिया, दिवसभर मिळते ऊर्जा 

महिलांनी गर्भावस्थेत करावे कारल्याचे सेवन, होती अनेक फायदे