वाढतोय बनावट नोटांचा ‘गोरखधंदा’ ! अशी ओळखा तुमच्या खिशातील 2000 आणि 500 रुपयांची नोट ‘असली’ की ‘नकली’, जाणून घ्या

पुणे : भारतात बनावट नोटांचा उद्योग अजूनही थांबलेला नाही. 10 जूनरोजी पुन्हा एकदा पुण्यात सुमारे 10 करोड रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. पकडण्यात आलेल्या नोटा 2000 आणि 500 रुपयांच्या आहेत. सरकारने फेक करन्सी रोखण्यासाठी जुन्या मोठ्या नोटांच्या ठिकाणी नव्या नोटा आणल्या. मात्र, यानंतरही बाजारात फेक करन्सीवर लगाम लावण्यात यश आलेले नाही. यासाठी लोकांनीच 2000 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा ओळखण्यास शिकले पाहिजे. कसे ते पाहुयात…

* 2000 ची नोट खरी की बनावट, असे ओळखा

2000 च्या नोटेचा मुख्य कलर मॅजेंटा आणि तिचा आकार 66 मिमी बाय 166 मिमी आहे. नोटेच्या दर्शनी भागात महात्मा गांधी आणि मागच्या बाजूला मंगळयानाचे छायाचित्र आहे.

ओळख नंबर-1 नोट प्रकाशासामोर धरल्यानंतर 2000 लिहिलेले दिसते.
ओळख नंबर-2 डोळ्यांसमोर 45 डिग्री एँगलवर ठेवल्यास 2000 लिहिलेले दिसते.
ओळख नंबर-3 देवनागरीमध्ये 2000 लिहिलेले दिसते.
ओळख नंबर-4 मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र आहे.
ओळख नंबर-5 छोट्या-छोट्या अक्षरात आरबीआय आणि 2000 लिहिलेले आहे.
ओळख नंबर-6 सिक्युरिटी थ्रेड आहे, यावर भारत, आरबीआय आणि 2000 लिहिले आहे. नोट थोडी दुमडल्यानंतर या थ्रेडचा कलर हिरव्यातून निळा होतो.
ओळख नंबर-7 गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सिग्नेचर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा दोन्ही बाजूला लोगो डावीकडे आहे.
ओळख नंबर-8 येथे महात्मा गांधींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप (2000) वॉटरमार्क आहे.
ओळख नंबर-9 वर सर्वात डाव्याबाजूला वर आणि खाली सर्वात उजव्या बाजूला लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

ओळख नंबर-10 येथे लिहिलेला नंबर 2000 चा रंग बदलतो. याचा रंग हिरव्यातून निळा होतो.
पहचान नंबर-11 उजवीकडे अशोक स्तंभ आहे.
पहचान नंबर-12 उजवीकडे आयताकार बॉक्स, ज्यामध्ये 2000 लिहिले आहे.
पहचान नंबर-13 उजवीकडे आणि डावीकडे सात ब्लीड लाईन्स आहेत. ज्या खडबडीत आहेत.

मागील बाजूस
ओळख नंबर-14 नोटेच्या प्रिंटिंगचे वर्ष लिहिलेले आहे.
ओळख नंबर-15 स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो.
ओळख नंबर-16 मध्यभागाकडे लँग्वेज पॅनल
ओळख नंबर-17 मंगळयानचा नमूना

* अंधांसाठी
महात्मा गांधींचे छायाचित्र, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्ह खडबडीत आहे.

* 500 रुपयांची खरी आणि बनावट नोट अशी ओळखा

ओळख नंबर-1 नोट उजेडात धरली असता 500 लिहिलेले दिसेल.
ओळख नंबर-2 डोळ्यांसमोर 45 डिग्रीच्या अँगलमध्ये ठेवल्यास येथे 500 लिहिलेले दिसेल.
ओळख नंबर-3 देवनागरीमध्ये 500 लिहिलेले दिसेल.
ओळख नंबर-4 जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या छायाचित्राचे ओरिएंटेशन आणि पोझिशन थोडी वेगळी आहे.
ओळख नंबर-5 नोट थोडी दुमडल्यास सिक्युरिटी थ्रेडचा कलर हिरव्यातून निळा होतो.
ओळख नंबर-6 जुन्या नोटांच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सिग्नेचर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डावीकडे शिफ्ट झाला आहे.
ओळख नंबर-7 येथे महात्मा गांधींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क आहे.
ओळख नंबर-8 वर सर्वात डीवकडे आणि खाली सर्वात उजवीकडे लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.
ओळख नंबर-9 येथे लिहिलेला नंबर 500 चा रंग बदलतो. याचा कलर हिरव्यातून निळा होतो.
ओळख नंबर-10 डावीकडे अशोक स्तंभ आहे. डावीकडे सर्कल बॉक्स ज्यामध्ये 500 लिहिलेले आहे.
डावीकडे आणि उजवीकडे 5 ब्लीड लाईन्स आहेत, ज्या खडबडीत आहेत.

* मागच्या बाजूला

ओळख नंबर-11 नोटेच्या प्रिंटिंगचे वर्ष लिहिलेले आहे.
ओळख नंबर-12 स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो.
ओळख नंबर-13 मध्यवर्ती भागाकडे लँग्वेज पॅनल.
ओळख नंबर-14 भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे छायाचित्र.
ओळख नंबर-15 देवनागरीत 500 लिहिलेले आहे.

* अंधासाठी
महात्मा गांधींचे छायाचित्र, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्ह खडबडीत आहे.