आता बँकेविषयीची ‘तक्रार’ थेट ‘RBI’ कडे दाखल करा ; जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एखाद्या बँकेकडून ग्राहकाला विनाकारण त्रास दिला जातो किंवा चांगली सेवा दिली जात नाही.अशा बँकेची आता बँकांची बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करता येणार आहे. बँक आणि गैर बँकिंग वित्तीय कंपनीच्या (NBFC) विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी RBI ने आपल्या वेबसाईटवर एक कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम (CMS) सुरु केली आहे. ग्राहकांच्या बँकेसंबंधी असणाऱ्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करणे हा CMS चा मुख्य उद्देश आहे पण या सिस्टमनुसार तक्रार दाखल करण्यासाठी खूप माहिती भरावी लागते.

उदारहरणार्थ तुम्हाला ज्या बँकेच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करायची आहे, त्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर यांच्यासहित खूप सारी माहिती द्यावी लागते. चला जाणून घेऊ या संपूर्ण प्रक्रिया.

१ तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला RBI च्या https://cms.rbi.org.in  या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर वेबसाईटच्या होमपेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लॉज कंप्लेंट असं पहायला मिळेल. यानंतर दुसऱ्या पानावर CMS ओपन होईल. तिथे डाव्या बाजूला फाइल कंप्लेंट लिंक पहायला मिळेल.

image.png

२ ड्रॉपडॉनवर हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडा आणि त्यानंतर बँक किंवा व्यक्ती किंवा NBFC च्या विरोधात तक्रार दाखल करा. ड्रॉपडाउन लिस्टमधून टाइप ऑन ऐंटीटी बैंक, एनबीएफसी किंवा सिस्टम पार्टिसिपेंटमधून एकाची निवड करा.

image.png

३ आता ‘लॉज कंप्लेंट पोर्टल’ वर सामान्य माहिती भरा. शेवटी कॅलेंडरवर क्लिक करा आणि डेट ऑफ कंप्लेंट’ तसेच ‘डेट ऑफ रिप्लाई’ च्या जागा भरा.

image.png

तक्रार ऑफिस ऑफ द ओम्बुड्समैन किंवा आरबीआयांच्या रिजनल ऑफिसकडे जाईल.

४ तक्रारीचे स्वरूप – येथे तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागेल. तुमची तक्रार कशाविषयी आहे, तक्रारीची सविस्तर माहिती भरावी लागेल.

image.png

५ बँकेचे स्वरूप – ड्रॉप डाउन लिस्टमधून अकाउंट श्रेणीची निवड करा. बँक खात्याची ATM/क्रेडिट/डेबिट कार्ड ची संपूर्ण तपशिलासह माहिती भरा. यानंतर डिस्प्यूटेड अमाउंट, कंपेंसेशन अमाउंट भरा आणि   ‘कंप्लेंट कमेंट्स सेक्शन’ मध्ये बैंक किंवा व्यक्ति ज्यांच्याविरोधात तक्रार दाखल करायची आहे त्यांची तपशिलासह माहिती भरा.

image.png

६ घोषणा – घोषणा पत्रात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक भरा. यानंतर एक्ससेप्ट वर क्लिक करा.

image.png

७ नामांकन – ज्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करायची आहे त्या व्यक्तीची माहिती भरा.

image.png

८ तक्रारी संबंधी एकही कागदपत्र असेल तर येथे जोडा.

image.png

९  शेवटी सबमिट बटणवर क्लिक करा. तुम्ही तुमची तक्रार यशस्वीपणे दाखल केली आहे.

image.png

तुम्हाला आता एक ऑटो जेनरेटेड एक्नॉलेजमेंट्स मिळेल. याचा वापर करून तुम्ही तुमच्या तक्रारीची अवस्था तपासू शकता.

image.png