मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी ‘या’ ६ खास ‘स्कीम’ ! घर बसल्या फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी विविध योजना आणत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ही जाहीरनाम्यातील घोषणा पूर्ण करण्यासाठी आता मोदी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे मोदी सरकारसाठी मोठे आव्हान असणार आहे. यासाठी मोदी सरकारकडून ज्या प्रमुख योजनांवर फोकस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात पीक विमा योजना, शेतीचे आधुनिकरण, जैविक खत, सॉइल आरोग्य कार्ड आणि शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत पोहचवणे या योजना आहेत. तुम्ही या सर्व योजनांचा लाभ घेतला नसेल तर या योजनेचा लाभ घेतल्यास शेतीत तुम्हाला मदत होईल.

या आहेत त्या योजना

१. पीक विमा योजना
कृषि मंत्रालयाने सांगितले की पीक विमा योजनेअंतर्गत २०१६ पासून आता पर्यंत देशातील शेतकऱ्यांना ४७,६०० कोटी रुपयांच्या क्लेमचा फायदा घेतला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नियोजन आहे.

२. शेतीचे आधुनिकीकरण
शेतीत तेव्हाच प्रगती होईल जेव्हा त्यात मशिनचा वापर वाढेल. कृषि मंत्रांनी दिलेल्या माहिती नुसार २०१६ पासून २०१९ पर्यंत देशात शेतकऱ्यांना २९,५४,४८४ मशीनचे वितरण करण्यात आले. तर २०१० ते २०१४ दरम्यान फक्त १०,१२,९०४ मशीनचे वाटप करण्यात आले होते. मशीन बँक बनवण्यासाठी सरकारने ४० टक्के सब्सिडी देत आहे.

३. राष्ट्रीय कृषी बाजर योजना
सरकारने आता पर्यंत देशातील ५८५ मंडईना ई – नाम अंतर्गत जोडले आहे. ई-नाम एक इलेक्ट्रॉनिक कृषि पोर्टल आहे. जे संपूर्ण भारतात अस्तित्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला एका नेटवर्क अंतर्गत जोडेल. याचा हेतू सर्व कृषि उत्पादनांना एक बाजर उपलब्ध करुन देणे.

४. सॉइल हेल्थ कार्ड
शेताची आरोग्य कसे आहे, ज्यात खताची किती प्रमाण टाकणे आवश्यक आहे. कोणते खत टाकणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांना हे माहित झाले तर खताचा होणारा वापर कमी होईल. यामुळे सरकारने सॉइल हेल्थ कार्डची योजना सुरु केली आहे. २०१५ ते २०१७ पर्यंत १०.६३ कोटी आणि २०१७ ते २०१९ पर्यंत १०.६९ कोटी सॉइल हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

५. जैविक शेती
रासायनिक पीकांच्या उत्पादनातून पीक आणि भाज्यांमुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. यासाठी सरकार जैविक शेतीत वाढ करण्यासाठी परंपरागत कृषि विकास योजना सुरु केली आहे. या अंतर्गत जैविक शेतीला एवढे प्रोस्ताहन देण्यात येत आहे की, या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात येईल. कृषी मंत्र्यांच्या मते सध्या देशात २७.१० लाख हेक्टर क्षेत्रात जैविक शेती करण्यात येत आहे.

६. पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सरकारने शेतकऱ्यांना थेट पैसे बँक खात्यात देण्यास सुरुवात केली. देशात १४.५ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला ६ – ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ८७,००० कोटी रुपयांची मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते, पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेअंतर्गत ५,४१,४२,३१९ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पैसे देण्यात आले आहे.

 

Loading...
You might also like