नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अर्थात आयपीपीबी (India Post Payments Bank/IPPB) ही भारत सरकारच्या टपाल विभाग (Post) आणि दळणवळण मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. यामध्ये 100 टक्के भागीदारी आहे. आयपीपीबी बचत खात्यावर सध्या 2.75 टक्के व्याज दिले जात आहे. आरबीआयच्या (IRB) मार्गदर्शक सूचनांनुसार ही बँक प्रत्यक्षात कुणाला कर्ज नाही देऊ शकत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (india post payments bank) सामान्य माणसासाठी एक सोयीस्कर आणि परवडणारी बँक आहे कारण याअंतर्गत ग्राहकांना पोस्टाच्या नेटवर्कमधील विविध फायदे मिळतात.
IPPB Digital Saving Account उघडण्यासाठी आवश्यक गोष्टी
1. हे खाते उघडण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्षे आहे
2. खाते उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरता तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा चेक पॉईंटमध्ये तुमची कागदपत्र जमा करावी लागतील.
3. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे Digital Saving Account, Regular Saving Account मध्ये अपग्रेड होते.
IBPPB मध्ये Online Bank Account उघडण्याची प्रक्रिया
1. गुगल प्ले स्टोअरवरुन आयपीपीबीचे App डाऊनलोड करा
2. त्याठिकाणी देण्यात आलेल्या ओपन युजर अकाऊंट नाऊ (open your account now) वर क्लिक करा.
3. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका
4. याठिकाणी तुमच्या पॅन क्रमांकाची आणि आधार क्रमांकाची गरज भासेल.
5. त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती भरुन तुम्ही खाते उघडू शकता
आयपीपीबी अॅप कसे वापरावे
1. IPPB APP मध्ये जाऊन तुम्हाला अकाऊंट नंबर, कस्टमर आयडी, जन्मतारीख आणि रजिस्टर मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
2. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल
3. त्यानंतर MPIN सेट करुन OTP टाकावा लागेल. अशाप्रकारे विद्यमान ग्राहकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
IPPB मोबाइल APP चे फीचर
IPPB APP च्या माध्यमातून ग्राहक विविध प्रकारचे ट्रान्झॅक्शन करु शकतात. या माध्यमातून तुम्ही खात्यातील बॅलन्स तपासू शकता, फंड ट्रान्सफर करु शकता किंवा याव्यतिरिक्तही काही महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन करु शकता.
1. खात्यातील शिल्लक रकमेची माहिती
2. बँक स्टेटमेंटसाठी रिक्वेस्ट
3. चेकबुकसाठी रिक्वेस्ट
4. चेकचे पेमेंट थांबवण्यासाठी रिक्वेस्ट
5. बँक नेटवर्क अंतर्गत फंड ट्रांसफर
6. दुसऱ्या बँक खात्यामध्ये फंड ट्रांसफर
7. वीज, पाणी आणि युटिलीटी बिलांचे पेमेंट
8. मोबाइल आमि डीटीएच रिचार्ज