Mobile Data Protection : तुमच्या मोबाइलमधून हॅक होऊ शकतो महत्वाचा डेटा, ‘या’ 5 पद्धतीने हॅकर्सपासून वाचवू शकता फोन

नवी दिल्ली : आपल्या स्मार्टफोन्समध्ये किमती आणि आवश्यक डेटा सेव्ह केलेला असतो. मात्र, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे आता फसवणुकीची विविध प्रकरणे समोर येऊ लागली आहे. हॅकर्स तुमच्या फोनला निशाणा बनवून तुमचा किमती डेटा चोरतात. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतीने तुमचा वैयक्तिक डेटा चोरतात. यासाठी सध्याच्या काळात मोबाइल फोन हॅकर्सपासून वाचवणे सुद्धा खुप आवश्यक झाले आहे. आज आम्ही तुम्हाल अशा काही टिप्स देत आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही फोन सेफ अँड सिक्युअर ठेवू शकता.

1 फोन लॉक –
फोन सुरक्षित ठेवण्यासाठी पिन, पासवर्ड आणि पॅटर्नचा वापर आवश्यक करा. प्रयन्न करा की तुमचा पिन, पासवर्ड आणि पॅटर्न थोडा गुंतागुंतीचा असेल. जेणेकरून कुणीही सहजपणे तुमचा फोन उघडू शकणार नाही. याशिवाय फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचा सुद्धा वापर केला पाहिजे.

2 थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करू नका –
फोन हॅकर्सपासून वाचवण्यासाठी कधीही थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करू नका. यामुळे तुमचा फोन आणि डाटा बर्‍यापैकी सेफ राहतो. थर्ड पार्टी अ‍ॅपमध्ये अशा लिंक आणि मालवेयर असतात ज्यामुळे तुमची माहिती लीक होते, शिवाय फोनचे सुद्धा नुकसान होते.

3 अ‍ॅप्सचे परमिशन पेज लक्षपूर्वक वाचा –
कोणतेही मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करताना परमिशन अ‍ॅप लक्षपूर्वक वाचा. जर अ‍ॅप कोणत्याही प्रकारचे कॉन्टॅक्ट आणि लोकेशनची परमिशन मागत असेल तर, ते इन्स्टॉल करू नका.

4 फ्री पब्लिक वाय-फायचा वापर करू नका –
कोणत्याही पब्लिक प्लेसवर फ्री वाय-फायचा वापर करू नका. सिक्युरिटी ब्रीचच्या अनेक घटना पब्लिक वाय-फायद्वारे होतात. पब्लिक वाय-फायवरून हॅकर्स सहजपणे फोन अ‍ॅक्सेस करू शकतात. विशेष करून ऑनलाइन ट्रांजक्शन अजिबात करू नका.

5 व्हीपीएन नेटवर्कचा वापर करा –
जर तुम्ही कुठे बाहेर असाल आणि पब्लिक वाय-फायचा वापर करत असाल तर व्हीपीएन सर्व्हिसद्वारे यूज करा. व्हीपीएनद्वरे वाय-फाय वापरल्याने तुमचे नेटवर्क बर्‍यापैकी सेफ राहिल. हॅकर्स तुमच्या डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस करू शकणार नाही आणि डाटा सुरक्षित राहिल.