जीरे : यात दडलेत अनेक गुण, अशाप्रकारे कराल सेवन तर शरीराला होतील अनेक फायदे

पोलिसनामा ऑनलाईन : कोरोना काळात फिट राहण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत आहेत. इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्याचे सर्वांचे प्रयत्न आहेत. इम्यून सिस्टम मजबूत ठेवायची असेल तर जीरे पाणी सेवन करू शकता. जीरा-पाणीचे सेवन काही लोक वजन कमी करण्यासाठी करतात.

संशोधनात सांगितलेले फायदे

1 जीरे जखमेसाठी अँटीसेप्टिकसारखे काम करते
2 याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते
3 शरीरातील टॉक्सिन बाहेर काढले जातात
4 अँटीकार्सिनोजेनिक गुणांमुळे पोट आणि लिव्हरच्या ट्यूमर्सचा धोका कमी होतो
5 इम्यून सिस्टम खुप मजबूत होते
6 यूरिन फ्लो सुद्धा वाढतो

जीरे असे करा सेवन

* इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात अर्धा जीरे टाकून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी सेवन करा जीरे चावून खा.
* जीरा पाणी प्यायल्याने इम्यून सिस्टम खुप मजबूत होते, तसेच फॅटसुद्धा बर्न होते. ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.