आता इंटरनेट नसतानाही ‘Google Maps’ वापरता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल तर गुगल मॅप्सचा सर्रास वापर केला जातो. गुगल मॅप्समुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. मात्र गुगल मॅप्सलाही काही मर्यादा आहेत. मात्र गुगल मॅप्सचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं अत्यावश्यक आहे. जर इंटरनेट बंद असेल तर किंवा इंटरनेट काम करत नसेल तर गुगल मॅप्सद्वारे पत्ता शोधणे अशक्य आहे. मात्र आता गुगल मॅप्सचा ऑफलाईन देखील वापर करणे शक्य आहे.

कोणत्याही भागामध्ये जाऊन या अ‍ॅपच्या माध्यमातून मॅप्स डाऊनलोड करता येतो. यासाठी गुगलने आपल्या युजर्सना अ‍ॅपमध्ये एक सुविधा दिली आहे. ऑफलाईन मॅप्स डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन नसल्यास अथवा स्लो झाल्यास याचा वापर करता येतो. या सुविधेमुळे डाऊनलोड केलेल्या मॅप्सचा वापर करता येणार आहे. ही सुविधा अँन्ड्रॉईड आणि iOS डिव्हाईससाठी उपलब्ध आहे.

‘ऑफलाईन मॅप्स’ डाऊनलोड –

१) android डिव्हाईससाठी
गुगल मॅप्स हा अ‍ॅप डाऊनलोड करा.
इंटरनेट कनेक्ट असताना गुगल मॅप्समध्ये साइन-इन करा.
ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण सर्च करा.
ठिकाण सर्च केल्यानंतर डाऊनलोड ऑफलाईन मॅप्सवर टॅप करा.

२) iOS डिव्हाईससाठी
iPhone अथवा iPad वर गुगल मॅप्स हे अ‍ॅप ओपन करा.
इंटरनेट कनेक्ट असताना गुगल मॅप्समध्ये साइन-इन करा.
ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सर्च करा आणि More वर टॅप करा.
त्यानंतर Download offline Map सिलेक्ट करा.